Pune Crime Branch | पुणे : मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | मोक्का गुन्ह्यात (Abscond In MCOCA Case) पाच महिने फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला (Criminal On Police Records) पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या युनिट दोन च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. आकाश उर्फ बटन प्रकाश कुडले उर्फ भांडीलकर (वय-20 रा. सच्चाई माता मंदिराजवळ, कात्रज, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(Pune Crime Branch)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट दोन च्या पथकाकडून पेट्रोलींग करण्यात येत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी कात्रज तलाव येथे फिरत असल्याची खात्रिशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कात्रज तलाव परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने आरोपीचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याला भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई,
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार मोकाशी, कुंभार, पवार, नेवसे, सरडे, शेख, कोकणे, चव्हाण,
राख महिला पोलीस अंमलदार ताम्हाणे यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | असा पोरकटपणा दाखवाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा विजय कधीच होत नाही, पुरावे माझ्याकडेही, अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा

Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी