Pune Crime Branch | पुणे पोलिसांचे सराईत गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर; सराईत गुन्हेगार नवनाथ वाडकर आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांमध्ये गोळीबाराचा थरार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime Branch | सराईत गुन्हेगार नवनाथ वाडकर (Navnath Wadkar) आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांमध्ये थरार, वाडकरने पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. पोलिसांनी देखील स्वः संरक्षणार्थ तीन गोळ्या झाडून वाडकर याचा सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुठा गावाच्या (Mutha) परिसरात घडली असून पोलिसांनी नवनाथ वाडकर आणि केतन साळुंखे याला अटक केली आहे.(Pune Crime Branch)

नवनाथ वाडकर हा सराईत गुन्हेगार (Criminal On Pune Police Records) असून त्यांच्यावर यापूर्वी देखील कारवाई करण्यात आली होती. तो खुनाच्या प्रयत्नाच्या दोन गुन्ह्यात फरार होता. त्याच्याकडे घटक हत्यार असल्याची मदती गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – २ ला मिळाली होती. तो मुठा गावच्या परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस मुठा गावाच्या परिसरात गेले. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस तेथे पोहचले. पोलिसांचा पाहून नवनाथ वाडकरने पोलिसांच्या दिशेने १ राऊंड फायर केला. पोलिसांनी देखील स्वः संरक्षणार्थ तीन गोळ्या झाडून वाडकर याचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला आणि त्याचा साथीदार केतन साळुंखे याला पकडले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lonikand Pune Crime | पुणे : विवाहितेला इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज करुन बदनामी करण्याची धमकी

Pune News | छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन