Pune Crime Branch | पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या (Spa Center In Chandan Nagar) वेश्या व्यवसायाचा (Prostitution Racket) पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या (SS Cell Pune) पथकाने पर्दाफाश केला आहे. चंदननगर परिसरातील खराडीमध्ये (Kharadi) असलेल्या गेरा इम्प्रेरियम अल्फामध्ये (Gera Imperium Alpha) पहिल्या मजल्यावरील द रिलीफ स्पा (The Relief Spa Kharadi) येथे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.19) सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली.(Pune Crime Branch)

याबाबत महिला पोलीस हवालदार रेश्मा गणपत कंक यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुरेश दिपक इंगळे Suresh Deepak Ingale (वय-28 रा. प्रगती नगर, काळेपडळ, हडपसर – Kale Padal Hadapsar) याच्यावर आयपीसी 370 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

खराडी परिसरातील गेरा इम्प्रेरियम अल्फामध्ये असलेल्या द रिलीफ स्पा या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एक बनावट ग्राहक त्या ठिकाणी पाठवून या संपूर्ण प्रकाराची खातरजमा केली आणि या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्यांना महिला वेश्याव्यवसाय करत असल्याचे दिसून आले. या महिलांची पोलिसांनी सुटका केली. आरोपी जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवून या महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होता. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडीत रेजितवाड (PI Pandit Rejitwad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashish Shelar On Baramati Lok Sabha | भाजपा नेते आशिष शेलार यांनी बोलता-बोलता एक मोठी चूक केली; म्हणाले… (Video)

Supriya Sule | …ही आहे शरद पवारांची ताकद ! न्यूयॉर्क टाईम्सचा दाखला देत सुळे यांचा विरोधकांवर घणाघात

Amit Shah On Ajit Pawar | भाजपासोबत गेल्याने अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या चौकशा थांबल्या का? अमित शहा म्हणाले…

Pune Lok Sabha Election 2024 | गाजावाजा न करता वसंत मोरेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वांनाच वाटले आश्चर्य