कोंढव्यात गुटखासह टेम्पो पकडला, अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोंढवा भागातील अजमेरा पार्क परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाकडून तंबाखुजन्य पदार्थ व पान मसाला यावर कारवाई करण्यात आली सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार प्रदीप टिळेकर, रमेश चौधर, मयुर सूर्यवंशी यांना मिळालेल्या माहितीनुसार टेम्पोतून गुटखा वाहतूक करताना पकडण्यात आले आहे .त्यात भवरलाल पेमारामजी भाटी (वय २८, रा.अजमेरा पार्क, कोंढवा खुर्द) याला पकडण्यात आले.

या कारवाईत टेम्पो तसेच गुटख्याची १२० पोती असा १५ लाख ७२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे . तसेच स्वारगेट परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून २५ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.