पुणे : NDA रस्त्यावरील मटका अड्डयावर गुन्हे शाखेचा छापा

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एनडीए रस्त्यावर लॉटरीच्या नावावर सुरू असणाऱ्या मटका आड्यावर गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी 6 जणांना अटक करत 11 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.

गणेश प्रकाश बारणे (रा.पर्वती), संदीप दशरथ भोसले (कोथरूड), हर्षल अशोक गायकवाड (गुरुवार पेठ), सुशील प्रदीप चव्हाण (कात्रज), तुषार दत्ता शिंदे (कात्रज) आणि सुशांत शिवाजी शिंदे (कोंढवा) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही छुप्या पध्दतीने हे अवैध धंदे सुरू आहेत. यादरम्यान गुन्हे शाखा युनिट 3 चे उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली मटका जुगार चालू असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी 6 जण आणि 11 हजाराची रोकड मिळाली. यातील गणेश आणि संदीप हे दिघे जुगार घेत होते. तर इतर चौघे खेळत असताना मिळून आले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/