Pune : गुन्हे शाखेकडून सराईत चोरट्यासह अल्पवयीन ताब्यात, सव्वा लाखाचे 10 मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका सराईत चोरट्यासह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सव्वा लाख रुपयांचे 10 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पेट्रोलिंग करत असताना या दोघांना संशयावरून पकडले आहे.

आतिष हंसराज माने (वय 21, जनता वसाहत, पर्वती, पुणे) याला अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आला आहे. तसेच त्यासाठी पेट्रोलिंग व गस्तीवर भर दिला जात आहे. या दरम्यान गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पथक दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी त्यांना एक दांडेकर पूल येथील पेट्रोल पंपाजवळ एकजण चोरीचे मोबाईल येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या दोघांना पकडण्यात आले. चौकशी करत झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे मोबाईल सापडले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून हे मोबाईल चोरले आहेत. त्यांच्याकडून चोरीचे सव्वा लाख रुपयांचे 10 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर, दीपक मते, एकनाथ कंधारे, मच्छिंद्र वाळके, रामदास गोणते, हनुमंत गायकवाड, संदीप तळेकर, सुजित पवार, सोनम नेवसे यांच्या पथकाने केली.