पुण्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍या दुकानदाराविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   लॉकडाऊन काळात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आणखी एका किराणा दुकानावर पोलिसांनी छापा मारला. त्याच्याकडून सव्वा चार लाखांचा साठा जप्त केला आहे. लोहगाव येथील गोपी जनरल स्टोअर्समध्ये करण्यात आली आहे.

नितीन सत्यनारायण अगरवाल (वय ४३, रा. आझाद चौक, लोहगाव) याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव गावठाणामध्ये असलेला किराणा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली असता, नितीन किराणा दुकानामध्ये सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून ४ लाख ३३ हजारांचा तंबाखूजन्य साठा जप्त करण्यात आल.

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन दिवेकर, शिवाजी राहिगुडे, रामचंद्र यादव, हेमा ढेबे, अमित छडीदार, सचिन चंदन, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.