Pune Crime | पुण्यात IAS अधिकार्‍याच्या घरात ‘धाडसी’ चोरी ! लक्ष्मी पुजनासाठी ठेवलेले दीड किलो सोन्याचे दागिने लंपास; प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | शहरात सर्वत्रच दिवाळी उत्साहात साजरी होत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात मुंढवा (Mundhwa) परिसरात राहणार्‍या महसूल विभागातील एका सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकार्‍याच्या घरात धाडसी चोरी झाली आहे. सेवानिवृत्त अधिकार्‍याचा मुलगा आयएएस अधिकारी (IAS Officer) असून सध्या त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमध्ये आहे अशी माहिती समोर आली आहे. चोरटयांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच रात्री साडेआकरा ते पाडव्याच्या पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मी पूजनामध्ये ठेवलेले तब्बल 150 तोळे वजनाचे म्हणजेच तब्बल दीड किलो सोन्याचे दागिने आणि अडीच लाख रूपये असा एकुण 43 लाख 50 हजार रूपयाचा ऐवज लंपास (Pune Crime) केला आहे.

 

याप्रकरणी दत्तात्रय संभाजी डोईफोडे dattatray sambhaji doifode (64, रा. ज्ञानेश्वरी बंगला सर्व्हे नं. 55, प्लाूट नं. 24, डेक्कन पेपरमिल रोड, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डोईफोडे हे महसूल विभागातून मोठया पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचे चिरंजीव सागर दत्तात्रय डोईफोडे हे आयएएस अधिकारी ( IAS officer doifode sagar dattatray ) असून सध्या त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीरमध्ये आहे. गुरूवारी लक्ष्मी पूजन असल्याने दत्तात्रय डोईफोडे यांनी घरातील जवळपास सर्वच पारंपारिक दागिने पूजनामध्ये ठेवले. त्यामध्ये मंगळसूत्र, नेकलेस, मोहनमाळ, बांगडया, तोडे, ब्रेसलेट, पाटल्या तसेच हिर्‍याचे सेट आणि रोख रक्कम 2 लाख 50 हजार रूपयांचा समावेश होता. एकुण 150 तोळे वजनाचे दागिने आणि 2 लाख 50 हजार रूपये रोख असा एकुण 43 लाख 50 हजार रूपयांचा ऐवज पुजनामध्ये ठेवण्यात (Pune Crime) आला होता.

डोईफोडे यांचे घर गुरूवारी रात्री 11.30 ते शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरटयाने (Pune Crime) बंगल्याचे गेटचे कुलूप तोडून व हॉलचे खिडकीचा गज कापून आत प्रवेश केला. आणि पूजनामधील सर्व दागिने आणि रोख रक्कम असा एकुण 43 लाख 50 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. मुंढवा पोलिस ठाण्यातील (Mundhwa Police Station) अधिकारी आणि गुन्हे शाखेचे (Pune Police Crime Branch) अधिकारी चोरटयांचा शोध घेत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Brave theft at IAS officer doifode sagar dattatray house in Pune ! Lampas with 1.5 kg gold ornaments kept for Lakshmi Puja; Huge excitement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Acidity Bloating Constipation | अ‍ॅसिडिटी-बद्धकोष्ठता-डोकेदुखी, दिवाळी पार्टीनंतर होत असेल त्रास तर आराम देतील ‘या’ 5 टिप्स; जाणून घ्या

Vinayak Raut | भाजपशी बेईमानी करुन कुठे जाणार? विनायक राऊतांचा राणेंना सणसणीत टोला

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांच्या मुलाने ED ची चौकशी टाळली, ऋषीकेश यांना वाटतेय ‘ही’ भीती