Pune Crime | वखार महामंडळाचा विश्वासघात ! एकाचवेळी कायम आणि कंत्राटी कर्मचारी म्हणून हजेरीपत्रकात केल्या सह्या; स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोरोना संसर्ग असताना लॉकडाऊनच्या काळात तात्पुरत्या दिलेल्या ओळखपत्राचा गैरवापर करुन तसेच नियमित कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या हजेरीपत्रकात एकाचवेळी सह्या करुन एका कर्मचार्‍याने वखार महामंडळाचा विश्वासघात (Wakhar Mahamandal Pune) केला. या आधारावर त्याने आपल्याला नोकरीत कायम करावे, अशी औद्योगिक न्यायालयात (Industrial Court Pune) मागणी केल्याचे समोर आले आहे. (Pune Crime)

याप्रकरणी वखार महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक प्रशांत बारावकर Prashant Barawakar (वय ४८) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९४/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सतीश शंकर घडशी
Satish Shankar Ghadashi ( रा. आनंदनगर, सिंहगड रोड – Anand Nagar Sinhagad Road) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे (Pune Crime). हा प्रकार मार्केटयार्डमधील (Market Yard, Pune) वखार महामंडळात मार्च २०२० ते जुलै २०२१ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश घडशी हा ब्रिस्क इंडिया (Brisk India Pvt Ltd) या कंपनीमार्फत १ फेब्रुवारी २०१२ पासून अटेंडन्ट कम ऑपरेटर म्हणून कंत्राटी पद्धतीने वखार महामंडळात तात्पुरत्या स्वरुपात काम करीत आहे. महामंडळातील तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक व सचिव यांच्याकडे अटेंडन्ट म्हणून काम पहात होता. त्यामुळे त्याला महामंडळातील सर्व शांखांमध्ये विनाअडथळा सहज प्रवेश मिळत होता. मार्च २०२० मध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचे निर्बंध लावले गेले. बाहेर संचारबंदी होती. त्याला कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य असल्याने नाकाबंदीतून सुट मिळावी, यासाठी त्याला महामंडळाचे तात्पुरत्या स्वरुपाचे ओळखपत्र देण्यात आले होते. त्याचा त्याने गैरफायदा घेतला आहे. घडशी याने महामंडळाच्या विरुद्ध औद्योगिक न्यायालयात महामंडळाचे सेवेमध्ये कायमस्वरुपी नियुक्ती मिळविण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. महामंडळाला न्यायालयामार्फत नोटीस प्राप्त झाली आहे.

या सोबत दाखल केलेल्या कागदपत्रांच्या प्रती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले की, घडशी याने महामंडळातील आस्थापना शाखेतील हजेरीपत्रकामध्ये मार्च २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत स्वत:चे नाव नियमित कर्मचारी या रकान्यात स्वहस्ते लिहून स्वाक्षर्‍या केलेल्या आहेत. त्याचवेळी याच कालावधीत कंत्राटी कर्मचारी हजेरी पत्रकामध्ये देखील स्वाक्षरी केलेली आहे. नियमित कर्मचारी यांचे हजेरीपत्रकांमध्ये एकाच दिवशी सर्व महिन्यांच्या व सर्व दिवसांच्या स्वाक्षर्‍या केल्या आहेत. या हजेरीपत्रकाची प्रत देखील बेकायदेशीररित्या उपलब्ध करुन घेऊन स्वत:च्या आर्थिक फायदासाठी त्याने हे कृत्य करुन महामंडळाचा विश्वासघात केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title : Pune Crime | breach of trust of wakhar mahamandal pune! signatures in attendance form as both permanent and contract staff; A case has been registered at Swargate police station

 

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त