Pune Crime | अंगावरील हळदीचा ‘कलर’ जाण्यापूर्वीच नवरीने दाखवला तिच्या नखऱ्याचा ‘रंग’, दोनच दिवसात केलं ‘हे’ भयानक कृत्य; जाणून घ्या प्रकरण

पुणे / भोर : पोलीसनामा ऑनलाइन – लग्न केलेल्या नवरीने (bride) दोनच दिवसात आपला खरा चेहरा सासरच्या लोकांना दाखवला. नव्या नवरीने घरातील सोन्याचे दागिने, कपडे आणि रोख रक्कम घेऊन पळून गेल्याची घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) घडली आहे. नव्या नवरीच्या या कृत्यामुळे सासरच्या मंडळींना मोठा धक्का बसला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) भोर तालुक्यात निगुडघर येथे घडली आहे. याप्रकरणी नगर जिल्ह्यातील नवऱ्या मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांवर भोर पोलीस ठाण्यात (Bhor police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

नवरदेवाचे वडिल कैलास बबन लिंभारे Kailash Baban Limbhare (वय-65 रा. निगुडघर) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास लिंभोरे यांना फलटण तालुक्यातील कापडगाव येथे पुर्नवसनातून जमिन मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे याठिकाणी येणे-जाणे असते. त्यांच्या जमीनी शेजारी असलेल्या बाबू जाधव याने सुरेश मारुती बुधावले (रा. दहीगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्याशी ओळख करुन दिली. (Pune Crime)

 

यानंतर सुरेश बुधावले याने राजू अवघडे व बापजी कृष्णा चव्हाण यांच्या मदतीने श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील राजू देवते यांची मुलगी मनिषा ही लग्नाची असल्याचे सांगितले. मात्र, या लग्नासाठी एक लाख 20 हजार रुपयाची मागणी केली. मुलाचे लग्न जमणार असल्याने लिंभारे यांनी पैसे देण्याचे कबुल केले. मुलीचे गाव लांब असल्याने आपण लग्नाच्या तयारीनेच जाऊ असे सुरेश बुधावले, राजू अवघडे व बापजी चव्हाण यांनी लिंभारे यांना सांगितले.

 

त्यानुसार शुक्रवारी (दि.1) नवऱ्या मुलासह 9 जण पेडगावला गेले. जाताना मुलीसाठी 22 हजार रुपयांचे मंगळसुत्र घेतले.
तसेच चांदीच्या पट्ट्या, जोडवी आणि तीन हजाराच्या साड्या घेतल्या.
त्यावेळी बापजी चव्हाण व राजू अवघडे यांनी कैलास लिंभारे यांच्याकडून साठ हजार रुपये घेतले.
पेडगावला गेल्यावर राजू देवते हा मुलगी मनिषा राजेंद्र पवार हिचा काका असल्याचे सांगून लग्न लावून दिले.
सायंकाळी नवरी मुलगी मनिषा हिला घेऊन ते निगुडघर येथे आले.

 

रविवारी (दि.3) कैलास लिंभोरे हे कापडगावला गेले तेव्हा घरात मुलगा दिगंबर, त्याची आई, नवीन नवरी मनिषा हे होते.
सोमवारी (दि. 4) पहाटे पाचच्या सुमारास मनिषा ही घरातील सोने, साड्या आणि रोख रोख 5 हजार रुपये घेऊन पळून गेली.
त्यानंतर कैलास लिंभोरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी नवरीसह पाचजणांवर फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे (PSI Baliram Sangale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | bride show her colour of way theft in two days with jewelry clothes and cash incident happen in bhor of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | चरस तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपीचे गोव्यातील हॉटेलमधून बेड्यांसह पलायन; पुणे ग्रामीण पोलिसांची शोध मोहीम सुरू

Mukesh Ambani’s RIL | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने केला ‘विक्रम’, यावर्षी गुंतवणुकदारांना दिला 37 % फायदा; जाणून घ्या

Stealthing | ‘सेक्स’च्या दरम्यान गुपचुप कंडोम काढण्यावर ‘इथं’ बनवला कडक कायदा ! चर्चा सुरू, लोक म्हणाले – ‘कसे होणार सिद्ध?’