Pune Crime | रिक्षात विसरलेली बॅग आणून दिली पण सोन्याचे दागिने, रोकड केली लंपास; चंदननगरमधील घटनेत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रिक्षाने जात असताना त्यात कपड्यासह सोन्याचे दागिने, रोकड असलेली बॅग रिक्षात (Auto Rickshaw) विसरली. नागरिकाने तिचा शोध घेतला. पण मिळाली नाही. त्यानंतर एके दिवशी रिक्षात विसरलेली बॅग दारात मिळून आली. त्यातील कपडे तसेच होते, मात्र, रोकड व सोन्याचे दागिने असा ९७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केलेला होता. (Pune Crime)

 

याबाबत एका नागरिकाने चंदननगर पोलीस ठाण्यात Chandan Nagar Police Station (गु. रजि. नं. १४५/२२) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी हे पत्नी, मुली व आईसह मगरपट्टा (Magarpatta) येथून चंदननगर येथे रिक्षाने प्रवास करीत होते. एकता चौकात उतरत असताना त्यांची रिक्षात बॅग विसरली. बॅगेत कपडे, १७ हजार रुपये रोख व ८० हजार रुपयांचे दागिने होते. त्यांनी बॅगेचा शोध घेतला, परंतु ती मिळाली नाही. रिक्षात विसरलेली ही बॅग २७ एप्रिल २०२२ रोजी फिर्यादी यांना दारात मिळाली. त्या बॅगेत पैसे व दागिने नव्हते. रोख रक्कम व दागिने रिक्षाचालकाने (Rickshaw Driver) चोरुन बॅग फिर्यादीच्या दारात टाकून निघून गेल्याची फिर्याद देण्यात आली आहे. विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Bring a forgotten bag in the rickshaw but gold jewelery cash lamps A case has been registered against a rickshaw puller in Chandannagar incident

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा