Pune Crime | पतीच्या निधनानंतर 29 वर्षीय महिलेवर दिराचा वॉच; थेट वहिनीच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे अन्…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी (Pimpri) परिसरामधील एक धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे. पतीच्या निधनानंतर 59 वर्षीय महिलेेवर वाॅच ठेवण्यासाठी दीर आणि सासऱ्याने संबधित महिलेच्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याचबरोबर आरोपींनी पीडित महिलेला आणि तिच्या लेकीला शिवीगाळ करत मारहाण केली. असा आरोप पीडित महिलेने केला. याप्रकरणी पीडित महिलेने दीर आणि सासऱ्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, पीडित महिला सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या 29 वर्षीय मुलीसोबत राहत आहे. महिलेच्या पतीचं अलीकडेच निधन झालं आहे. पतीच्या निधनानंतर आरोपी दीर (वय. 58) आणि सासऱ्यांनी (वय, 92) तिचा छळ सुरू केला. पतीचं निधन होताच आरोपींनी पीडितेवर नजर ठेवता यावी, यासाठी तिच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. जेणेकरून घरात काय सुरू आहे? याची सर्व माहिती आरोपींना मिळू शकेल. संबधित आरोपींकडून पीडित महिलेवर 24 तास वॉच ठेवला जात होता. (Pune Crime)

तसेच, तुम्ही दोघीही आयत्यावर बिळावर बसला आहात, येथून निघून जा, असं म्हणून आरोपींनी मायलेकीला मारहाण, शिवीगाळ केली. आरोपीनं काही दिवसातच फिर्यादीच्या 29 वर्षीय मुलीलाही त्रास द्यायला सुरुवात केली. आणि भररस्त्यात त्यांना शिवीगाळ केली. याशिवाय आरोपी दिरानं फिर्यादीच्या मुलीबाबत अश्लील शेरेबाजी करत ‘तुझी तर सेटिंगच लावतो’ असं अश्लील बोलत पीडित मायलेकीचा छळ केला. या त्रासाला त्रस्त होऊन पिडित महिलेनं शेवटी शनिवारी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) धाव घेतली. याप्रकरणी दीर. सासऱ्याविरोधात पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर (PSI Kavita Rupner) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Accident on Pune-Nagar Highway near shikrapur 5 dead pune cctv footage of horrific accident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Mother And Son Dance Video | आई-मुलाच्या जोडीने उडवली खळबळ,
‘नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स पाहून नोरा फतेहीला देखील पडेल भुरळ

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक,
अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

Ilena D’Cruz Oops Moment | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्याने इलयाना डीक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार