Pune Crime | एक कोटी 18 लाखाच्या फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांकडून बिल्डरला अटक; 33 जणांविरोधात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | बनावट कागदपत्रांच्या (Fake Documents) आधारे फ्लॅटचे करारनामा करत अकरा जणांना एक कोटी 18 लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police) अटक केली. आणखी एका गुन्ह्यात अटक (Pune Crime) करण्यात आली आहे.

 

महेश रामचंद्र तिखे Mahesh Ramchandra Tikhe (रा. कोथरूड-Kothrud) असे अटक बिल्डरचे नाव आहे. त्याच्यासह एकूण 33 जणांविरोधात उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2013 ते 2018 या कालावधीत कोंढवे धावडे (kondhawe dhawade) येथे घडला. फिर्यादी यांनी आरोपी तिखेच्या कोंढवे धावडे (kondhawe dhawade) परिसरातील प्रकल्पाच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट आरक्षित केली होती. त्यासाठी त्यांनी आरोपीला एकूण सव्वा सहा लाख रुपये दिले. या सदनिकेचा नोंदणी करारही (रजिस्टर अग्रीमेंट) केला. मात्र, तिखे याने जागामालकासोबतचा करारनामा रद्द केला असतानाही खोटा दस्त तयार करून फिर्यादींसोबत करारनामा केला.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

आरोपीने नियोजित इमारतीमध्ये सदनिके व्यतिरिक्त सामाईक पार्किंग, सामाईक स्वच्छतागृह, नळ जोडणी आदी सुविधा देण्याचेही मान्य केले होते. मात्र, यापैकी कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. आरोपींनी संगनमताने खोटे दस्तावेज तयार करून ते खरे आहेत, असे भासवून फिर्यादींची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.

 

आरोपी तिखेला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिखे व अन्य आरोपींनी अशा प्रकारे
आणखी दहा जणांची एकूण एक कोटी १८ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात समोर आले असून,
गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील किरण बेंडभर (Assistant Public Prosecutor Kiran Bendbhar) यांनी केली.
ही मागणी मान्य करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर (First Class Magistrate Janhvi Kelkar) यांनी तिखे याला ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
कोर्टाने त्याला ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर (First Class Magistrate Janhvi Kelkar) यांनी सोमवारी हा आदेश दिला.

 

Web Title :- Pune Crime | Builder Mahesh Ramchandra Tikhe arrested by Pune police in Rs 1.18 crore fraud case; FIR against 33 persons

 

Pune Crime | हॉटेल गारवाचे मालक आखाडेंच्या खून प्रकरणी आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या आज काय झालं कोर्टात
Anti-Corruption | पोलिस उपनिरीक्षक 80 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ
Nashik Crime | दोघा भावांवर सपासप वार करत जीवघेणा हल्ला; नाशिक शहरातील खळबळजनक घटना, Video व्हायरल