Pune Crime | ‘बिल्डर’ पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेकडे मगितली 14 कोटींची खंडणी, 3 बांधकाम व्यवसायिकांवर FIR

पुणे / तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन  –  Pune Crime | भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय (Construction business) करत असातना आर्थिक कारणांवरुन झालेल्या वादातून भागिदारावर खोटे गुन्हे दाखल केले. तसेच भागिदाराच्या पत्नीला कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी दाबाव टाकला. महिलेच्या भागिदार पतीला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन 14 कोटी रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तीन बांधकाम व्यवसायिकांवर (Builder) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

मिलिंद भागवत पोखरकर (Milind Bhagwat Pokharkar), मनोदिप चव्हाण (Manodip Chavan) आणि एक महिला अशी गुन्हा (FIR) दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.8) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 7 जून 2019 ते 2 ऑक्टोबर 2021 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथील कडोलकर कॉलनीत (Kadolkar Colony) घडला आहे. पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपींवर भादवि कलम 387, 385,211,504,506,34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे भागिदारीमध्ये बांधकाम व्यवसाय करत होते.
तक्रारदार महिला यांचे पती आणि आरोपींनी व्यवसायासाठी जी एस महानगर बँक (GS Mahanagar Bank) तळेगाव दाभाडे शाखेतून अडीच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
हे कर्ज सर्व भागिदारांनी फेडायचे होते.
परंतु आरोपींनी कर्ज फेडण्यास टाळाटाळ केली. आरोपी मिलिंद पोखरकर याने केर्ज फेडण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी घरी बोलावून घेतले.

मिलिंद पोखरकर याच्याकडे कपिला इंटरप्रयजेस फर्मचे (Kapila Enterprises firm) 30 लाख 37 हजार 500 रुपये होते.
मात्र, त्यांच्या खात्यावर पैसे नसल्याने त्यांनी दिलेले दोन्ही चेक बाऊन्स (Check bounce) झाल्याने
फिर्यादी यांनी मिलिंद पोखरकर यांच्या विरोधात न्यायालयात याचिका (Petition in court) दाखल केली. फिर्यादी यांनी दाखल केलेली याचिका मागे घेतली नाही.
याचा राग मनात धरून मिलिंद पोखरकर याने फिर्यादी यांच्या पतीवर खोटे गुन्हे (Pune Crime) दाखल केले.

 

आरोपी मिलिंद पोखरकर यांनी काही कागदपत्र तयार करुन त्यावर फिर्यादी यांना सह्या करण्यास सांगितले.
मात्र, त्यांनी कागदपत्रांवर सह्या करण्यास नकार दिला.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेला तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन पतीवर दाखल असलेले गुन्हे (Pune Crime) मागे घेणार नसल्याचे सांगितले.
तसेच आणखी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन महिलेकडे वारंवार 14 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Builder threatens to kill partner, demands Rs 14 crore ransom from woman, FIR against 3 builders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | गर्लफ्रेंडसोबत मस्त ‘मज्जा’ मारत होता पोलिस निरीक्षक, पत्नी पोहचताच सुरू झाली हाणामारी

EPFO खातेदारांसाठी खुशखबर ! वाढू शकते तुमची कमाई, जाणून घ्या काय आहे प्लान?

Chitra Wagh | ‘उदय शेट्टी आणि मजनू मध्ये संजय राऊतांचा घुंगरू सेठ झालाय’