Pune Crime | ससून हॉस्पिटलमधून रुग्णांच्या नातेवाईकांच्या दुचाकी चोरणारा गजाआड, 13 दुचाकी जप्त (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार घेत असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांच्या दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पुण्यातील (Pune Crime) बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden police) बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने पुणे शहर व सातारा शहरात (Satara) दुचाकी चोरल्याचे (stolen) तपासात निष्पन्न झाले आहेत. त्याच्याकडून 13 दुचाकी जप्त केल्या आहे. अख्तर चांद मुजावर (वय-44 रा. मुपो बनवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

 

 

याप्रकरणी सैफन चांदसाब मुजावर (रा. बिबवेवाडी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे नातेवाईक ऑगस्ट 2021 मध्ये ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असल्याने त्यांना भेटण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी त्यांची दुचाकी हॉस्पिटलच्या आवारातून चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तब्बल 200 सीसीटीव्ही फुटेज तपासले.

पोलिसांनी दुचाकी चोरतानाचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता आरोपी सातारा येथील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडून 13 दुचाकी जप्त केल्या. आरोपी ससून हॉस्पिटल परिसरातून 6, पुणे शहर, हडपसर, निगडी, स्वारगेट आणि सातारा शहरातून दुचाकी चोरल्याचे तपासात (Pune Crime) निष्पन्न झाले.

 

अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil),
सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे (ACP Chandrakant Sangale),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी (Senior Inspector of Police Yashwant Gawri),
पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते (Police Inspector Ashwini Satpute)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी राहुल पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन काळे,
पोलीस अंमलदार फिरोज शेख, हरिष मोरे, प्रताप गायकवाड, सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, संजय वणवे,
सागर घोरपडे, किरण तळेकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Bundgarden police arrest vehicle thief who theft two wheelers from Sassoon Hospital 13 two-wheelers seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sania Mirza | सानिया मिर्झाच्या मुलाची तब्येत बिघडली, शोएब मलिक बांग्लादेश दौ-याहून रवाना

Dnyandev Wankhede | मलिकांच्या नव्या ट्विटनंतर, ज्ञानदेव वानखेडेंनी ‘हे’ फोटो शेअर करुन केले स्पष्टीकरण; म्हणाले…

Mansukh Hiren Murder Case | सचिन वाझेचा चौकशी समितीसमोर धक्कादायक खुलासा, म्हणाला – ‘त्या प्रकरणात मी फक्त प्यादा’