Pune Crime | पुण्यात बॉलपेनवरुन घरफोडीचा गुन्हा उघड, विमानतळ पोलिसांकडून 29 लाखांचा मुद्देमाल जप्त; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात (Pune Crime) घरफोडी (Burglary) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. विमानतळ पोलिसांनी आरोपीकडे सापडलेल्या एका बॉलपेन वरून (Ballpen) घरफोडीचे 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून गुन्ह्यातील तब्बल 29 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) लोहगाव (lohegaon) येथील निरगुडी रोडवर करण्यात आली आहे.

 

गजराज मोतीलाल वर्मा Gajraj Motilal Verma (वय-38 रा. पानमळा, धायरी वडगाव,पुणे मुळ रा. कोटरी ता. आष्टा जि. सिव्होर, मध्य प्रदेश), गोरे उर्फ गणेश रती राणा Gore alias Ganesh Rati Rana (वय-22 रा. रिद्धी सिद्धी सोसायटी, पेडगाव पनवेल, नवी मुंबई, मुळ रा. कुंती, ता. बंडाली जि. मुगलशने, नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील पोलीस नाईक अंकुश जोगदंडे (Ankush Jogdande), शिवराज चव्हाण (Shivraj Chavan) व विनोद महाजन (Vinod Mahajan) यांना माहिती मिळाली की, लोहगाव येथील निरगुडी रोडवर संशयित आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गजराज वर्मा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या चारचाकी गाडीची झडती घेतली. त्यावेळी गाडीमध्ये घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांना सापडले. तसेच एक सिल्व्हर रंगाचा Sheaffer कंपनीचा बॉलपेन आढळून आला. त्यावर इंग्रजीमध्ये अरविंद हिंगे (Aravind Hinge) असे लिहिलेले होते. आरोपीकडे सापडलेल्या पेनवरील नावाच्या व्यक्तीने ऑक्टोबर मध्ये घरफोडीचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात दाकल केला होता.

 

त्यानुसार पोलिासंनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच आरोपीने त्याचे साथिदार गणेश राणा आणि शशिकांत भिमराव जाधव (वय-32 रा. बिटरगाव, पो. वांगी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्या मदतीने लोहगाव, चंदननगर परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितले. पोलिासंनी विमानतळ पोलीस ठाण्यातील 8 आणि चंदननगर पोलीस ठाण्यातील (Chandannagar Police Station) एक गुन्हा उघडकीस आणून 29 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने (Gold-Silver Jewelry) जप्त केले आहेत. आरोपींवर पुणे शहरात यापुर्वी चोरी, घरफोडी अशा प्रकारचे 24 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar),
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav)
आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Police Inspector Mangesh Jagtap)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव (PSI Sachin Jadhav),
पोलीस कर्मचारी अविनाश शेवाळे, गणेश साळुंखे, सचिन जाधव, रमेश लोहकरे, उमेश धेंडे, सचिन जाधव,
रुपेश पिसाळ, हरुण पठाण, अंकुश जोगदंडे, विनोद महाजन, नाना कर्चे, शिवाराज चव्हाण, गिरीश नागेकर, किरण अब्दागिरे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | burglary case Pune, Viman Nagar Police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Budget Session | ठाकरे सरकारचा निर्णय ! यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात होणार

Risk Free Money | जर तुम्ही तुमचे बचतीचे पैसे ‘या’ ठिकाणी गुंतवले तर तुम्हाला होईल फायदा ! जाणून घ्या कसा बनवला जातो ‘रिस्क फ्री मनी’

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्येही ‘हा’ 100 रुपयांचा स्टॉक, एक्सपर्ट देत आहेत खरेदी करण्याचा सल्ला