Pune Crime | शहरात घरफोडीचा हैदोस; हिंगणे खुर्द, वाघोली, भवानी पेठेत घरफोडी, १६ लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शहरातील विविध भागात चोरट्यांनी घरफोडीचा (House Burglary) हैदोस घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हद्दीत बीट मार्शलांसह पेट्रोलिंग (Beat Marshall Patrolling) करणाऱ्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हिंगणे खुर्द (Hingane Khurd), वाघोली (Wagholi), भवानी पेठेत (Bhawani Pethe) चोरट्यांना घरफोडी करून १६ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. (Pune Crime)

 

भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी महिला डॉक्टरांचे दागिने (Gold Jewelry), रोकडसह इतर मिळून ७ लाख १७ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १ सप्टेंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास हिंगणे खुर्दमधील आनंद विहारमध्ये घडली. याप्रकरणी डॉ. शमा दरवडे Dr. Shama Darwade (वय ६३) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात (Sinhagad Police Station) तक्रार दिली आहे. डॉ. शमा शनिवारी सकाळी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून १२ हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा ७ लाख १७ हजारांचा ऐवज चोरून नेला. घरी आल्यानंतर डॉ. शमा यांना चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीपक कादबाने (Assistant Police Inspector Deepak Kadbane) तपाास करीत आहेत.

 

चोरट्यांनी फोडली एक्सप्रेस कुरिअर शॉपी
पुणे-एक्सप्रेस कुरिअर शॉपीचे (Pune-Express Courier Shop) कुलूप तोडून चोरट्यांनी ३५ हजारांचे पार्सल, साडेसात हजारांचा मोबाइल असा ४२ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २९ सप्टेंबरला केसनंद वाघोली रस्त्यावर हरगुडे इमारतीत घडली. याप्रकरणी संकेत ढोरे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात (Lonikand Police Station) तक्रार दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक गजानन पवार (Assistant Police Inspector Gajanan Pawar) तपास करीत आहेत. (Pune Crime)

शिरसवडीत पुरातण वस्तूंवरही डल्ला
दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी पुरातण वस्तूंची चोरी (Theft) केली आहे. ही घटना २२ सप्टेंबरला शिरसवडीत ता. हवेलीत घडली.
याप्रकरणी महायार इराणी Mahayar Irani (वय ४९) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

इराणी यांनी पुरातण वस्तू जतन करून ठेवल्या होत्या. २२ सप्टेंबरला चोरट्यांनी त्यांचा दुकानाचे कुलूप तोडले.
४ लाख ७४ हजारांच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलिस तपाास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Burglary rampages in the city; Burglary in Hingane Khurd, Wagholi, Bhawani Peth, 16 lakhs in lieu of loot crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही…हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने ‘रोखठोक’ सुनावले

Deepak Kesarkar | अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर केसरकरांचे स्पष्टीकरण, म्हणाले – एकनाथ शिंदे तेव्हा निर्णय प्रक्रियेतच नव्हते मग…

Shivsena | ‘धर्मवीर’ सिनेमा शिंदेवर होता की दिघेंवर, असा प्रश्न लोकांना पडला, राजकीय फायद्यासाठी केला वापर, शिवसेनेचा आरोप