×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | माहिती लपवून बँकेची केली पावणेसात कोटी रुपयांची फसवणूक; कमलेश...

Pune Crime | माहिती लपवून बँकेची केली पावणेसात कोटी रुपयांची फसवणूक; कमलेश बेताला याच्यावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | स्थावर मालमत्तेबाबत (Immovable Property) लघुवाद न्यायालयात (Petition Court) वाद सुरु असताना त्याची माहिती लपवून ठेवून ती मालमत्ता बँकेत तारण ठेवून ५ कोटी रुपयांचे कर्ज (Lone) घेऊन बँकेची पावणेसात कोटी रुपयांची फसवणूक (Fraud Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या (Central Bank of India, Camp Branch, Pune) कॅम्प शाखेचे व्यवस्थापक प्रशांत कुमार गुप्ता (Prashant Kumar Gupta) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७४/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कमलेश राजेंद्र बेताला Kamlesh Rajendra Betala (वय ३४, रा. सुपार्श्वनाथ सोसायटी, बिबवेवाडी – Bibwewadi) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार ३ फेब्रुवारी २०१७ ते २२ जुलै २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश बेताला याने सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडे तारण म्हणून दोन मालमत्ता गहाण ठेवून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. बँकेने ३ फेब्रुवारी २०१७ रोजी त्यांना कर्ज मंजूर केले. त्यानंतर त्यांनी अजूनपर्यंत कर्जाची परतफेड केली नाही. बँकेने चौकशी केल्यावर त्यांनी ज्या मालमत्ता गहाण ठेवल्या. त्याबाबत लघुवाद दिवाणी न्यायालयात वाद सुरू आहे. त्यात या मालमत्तेवर कोणताही थर्ड पार्टी इंटरेस्ट (Third Party Interests) तयार करु नये, असा आदेश दिलेला असल्याचे दिसून आले. ही बाब कमलेश बेताला याने लपवून ठेवून बँकेची दिशाभूल करुन कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले.

 

मुद्दल व व्याज मिळून आतापर्यंत ६ कोटी ७० लाख ६० हजार ४९२ रुपयांची परतफेड न
करता आर्थिक फसवणूक (Cheating Case) केली. पोलीस निरीक्षक शेळके (Police Inspector Shelke) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | By hiding the information, the bank was
defrauded of Rs. 7 crores; A case has been registered against Kamlesh Betala

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News