Pune Crime | ज्येष्ठाला लुटणाऱ्या कॅबचालकाला पोलिसांनी केली अटक; साथीदारांचा शोध सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड पोलीस पथकाने एका कॅबचालकाला अटक केली आहे. त्याच्या कॅबमधून प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला या चालकाने लुटले (Pune Crime) होते. सदर कॅब चालक आणि त्याच्या साथीदाराने संबंधित नागरिकांकडून जबरदस्तीने त्याच्या एटीएम कार्डाचा पिन नंबर घेऊन पैसे काढले. त्या पैशांतून महागडा फोन, सोन्याची चैन, खरेदी केली होती. पोलिसांनी आरोपीला (Pune Crime) अटक केली असून, त्याच्याकडून जवळजवळ साडेसात लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

 

कृष्णा उत्तम कांबळे असे या कॅबचालकाचे नाव असून, त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. ही घटना २ ऑक्टोबरला घडली होती. याबाबत ७७ वर्षीय वृद्धाने तक्रार नोंदवली होती. तक्रारदार मुंबईचा रहिवाशी असून, कामानिमित्त पुण्यात आले होते. पुण्यात आल्यानंतर त्यांनी कॅब घेतली, पण आरोपीने कॅबमधून फिरवले आणि त्याच्या कॅबमध्ये त्याचा साथीदार श्रीधर साहू आणि अजून एक जण बसला. त्यानंतर या तिघांनी जबरदस्तीने फिर्यादीचे एटीएम घेऊन त्याचा पिन मिळवला. त्यानंतर त्यांनी त्या कार्डाने एक आयफोन, एक लाखाची सोन्याची चैन आणि एक दुचाकी विकत घेतली. तोपर्यंत सदर नागरिकाने सिंहगड पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार दिली.

जेव्हा आरोपी नवले पुलाखाली आहे अशी माहिती मिळाली, तेव्हा माहिती तपास पथकाचे सहायक निरीक्षक सचिन निकम,
पोलीस शिपाई अविनाश कोंडे यांनी सापळा रचून सोनावणेला अटक केली. त्याची चौकशी केली असता,
त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून एक आयफोन, सोन्याची चैन,
दुचाकी तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडी असा एकूण ७ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्याच्या बाकीच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी परिमंडळ तीनचे उपायुक्त सुहेल शर्मा,
सहायक आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर,
सहायक निरीक्षक सचिन निकम, हवालदार संजय शिंदे, अमित बोडरे, देवा चव्हाण, सागर शेंडगे, स्वप्नील मगर,
शिवाजी क्षीरसागर करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | cab driver who forcibly robbed senior passenger arrested 7 lakhs including gold chain mobile phone seized pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shinde-Fadnavis Govt | आधी मंत्रिमंडळ विस्तार, की महामंडळ वाटप? शिंदे – फडणवीसांकडून लवकरच मोठा निर्णय

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंवर त्यांचे आमदार नाराज; ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं

Siddarth Jadhav | सिद्धार्थ जाधवच्या येण्याने घरात निर्माण होणार टेन्शनचे वातावरण; कारण सिद्धार्थ जाताना…..