Pune Crime | चक्क चारचाकीतून येऊन महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र नेले हिसकावून; चंदननगर-खराडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विमानाने येऊन तसेच कारमध्ये सोसायटीत शिरुन घरफोडी करणारे चोरट्यांना पोलिसांनी यापूर्वी पकडल्याचे दिसून आले होते. दुचाकीवरुन येऊन रस्त्यावरुन जाणार्‍या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून (Chain Snatching) नेण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. परंतु, आता या चोरट्यांनी त्यासाठी चक्क कारचा वापर करायला सुरुवात केली आहे. कारमधून आलेल्या तिघा चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयांचे मंगळसुत्र हिसका मारुन चोरुन नेल्याची घटना खराडी बायपासवर घडली आहे. (Pune Crime)

याप्रकरणी खराडीत (Kharadi) राहणार्‍या एका ६५ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १८३/२२) दिली आहे (Pune Crime). त्यावरुन पोलिसांनी तिघा चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. (Chain Snatching In Chandan Nagar-Kharadi)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजता पेपर आणण्यासाठी खराडी बायपास रोडवरील फुटपाथवरुन जात होत्या. अशोका प्लाझा बिल्डिंगसमोर त्या आल्या असताना एका पांढर्‍या रंगाच्या कारमधून तिघे जण आले. त्यांच्यातील मागे बसलेला एक जण खाली उतरुन त्यांच्याजवळ चालत आला. त्याने हा रोड कोठे जातो, असे विचारुन त्यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाचे १ लाख २० हजार रुपयांचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारुन तोडले व कारमध्ये बसून ते पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | came from a four wheeler and snatched the mangalsutra from the woman’s neck; Chain Snatching Incidents in Chandannagar Kharadi area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त