Pune Crime | लग्नाला आला अन् पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला, फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला 6 वर्षांनी अटक

0
420
Pune Crime | Came to get married and got caught in Pune police net, fugitive accused in fraud arrested after 6 years
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फसवणुकीच्या (Fraud) गुन्ह्यात मागील सहा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला डेक्कन जिमखाना पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. लग्नसमारंभासाठी आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक (Arrest) केली. सन्मान बाबासाहेब मापारे (Samman Babasaheb Mapare) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे (Pune Crime) नाव आहे.

 

आरोपी मापारे याच्यावर 2016 मध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) आयपीसी 420, 406, 506(2), 192, 120ब, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता.
मात्र तपास पथकाला आरोपी लग्नसमारंभासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या. (Pune Crime)

 

पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांच्या सुचनेनुसार फरार आरोपीविरुद्ध विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
त्या पार्श्वभूमीवर पोलीस फरार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी डेक्कन पोलीस ठाण्यात 2016 मध्ये दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीने जामीनासाठी उच्च न्यायालयात (High Court) अर्ज केला होता.
मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून (Bail Application) लावला होता.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार (Senior Police Inspector Sandipan Pawar),
सहायक पोलीस निरीक्षक कल्यणी पाडोळे (API Kalyani Padole) यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Came to get married and got caught in Pune police net, fugitive accused in fraud arrested after 6 years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sangli ACB Trap | 1.5 लाखाची लाच स्वीकारताना महसुल विभागातील 2 मोठे मासे अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police News | पुणे पोलिसांकडून आदान-प्रदान कार्यक्रम, सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार

Pune Crime | वाहतूक पोलिसांची दादागिरी, PMPML बस चालक व वाहकाला पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण