Pune Crime | गडचिरोली येथून आणलेल्या गांजाची पुण्यात विक्री? चौघांना गुन्हे शाखेकडून अटक, अडीच लाखांचा गांजा जप्त

0
370
Pune Crime Pune police Crime Branch Anti Narcotic Cell arrests youth for selling cannabis at home
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गडचिरोली (Gadchiroli) येथून आणलेल्या गांजाची (Marijuana) पुण्यात विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने (Anti Narcotic Cell Pune) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. प्रवासादरम्यान गांजाचा वास येऊ नये यासाठी आरोपींनी गांजावर सुगंधी अत्तराची (Perfume) फवारणी केली होती. आरोपींकडून अडीच लाख रुपये किंमतीचा 12 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. (Pune Crime)

 

प्रशिक पुरूषोत्तम झाडे (Prashik Purushottam Zade), विकास रेवाचंद बनसोड (Vikas Revachand Bansod), वेदांती देविदास निकोरे (Vedanti Devidas Nikore), श्यामकला सुखदेव किरंगे Shyamkala Sukhdev Kirange (सर्व रा. गडचिरोली ) अशी अटक केलेल्या आरोपींची (Pune Crime) नावे आहेत.अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.13) हिंगणे खुर्द (Hingane Khurd) परिसरात केली. आरोपींविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार नितीन जगदाळे (Nitin Jagdale) यांना गडचिरोली येथून ट्रॅव्हल्सने आलेले चौघेजण हिंगणे खुर्द (Hingne Khurd) परिसरात गांजाची (Ganja) विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनसुर पोलिसांनी हिंगणे खुर्द परिसरात सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अडीच लाख रुपये किंमतीचा 12 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. प्रवासादरम्यान गांजाचा वास येऊ नये यासाठी त्यावर सुगंधी अत्तराची फवारणी केल्याचे उघडकीस आले.

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर
(Police Inspector Prakash Khandekar), पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), पोलीस प्रसाद बोमदांडी, मयूर सूर्यवंशी,
संतोष देशपांडे,चेतन गायकवाड, संतोष जाचक, संदीप शेळके, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बस्टेवाड, दिशा खेवलकर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Cannabis Marijuana ganja imported from Gadchiroli sold in Pune? pune police crime branch arrest 4, 2.5 lakh cannabis seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cancer Treatment | शास्त्रज्ञांचा दावा – एक्सरसाईज सोबत खा ‘या’ 2 स्वस्त गोष्टी, कॅन्सरचा धोका 70% होईल कमी; जाणून घ्या

PMI CV Manufacturing Plant in Pune | पुण्यात इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी PMI उभारणार नवीन मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट, होणार 2500 बसेसचे उत्पादन

Long Life Secrets | 100 वर्ष जगणार्‍या लोकांनी सांगितले त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य, अवश्य अवलंबा खाण्या-पिण्याच्या ‘या’ 5 सवयी; जाणून घ्या