Pune Crime | पुण्यात दुध घेण्यासाठी बाहेर पडलेल्यांचे मोबाईल चुटकीत ‘गायब’ करणारा CCTV मध्ये कैद ! पुण्याच्या मध्यवस्तीसह भारती विद्यापीठ अन् वारजे माळवाडी परिसरातून चोरलेले 22 हॅन्डसेट जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सकाळच्या वेळी दुध अथवा काही कामासाठी लोक दरवाजा लोटून घराबाहेर गेल्याचे पाहून तो आत शिरायचा आणि कोणाला काही समजायच्या आत घरात चर्जिंगला लावलेले अथवा ठेवलेले मोबाईल घेऊन लंपास व्हायचा. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने शहराच्या विविध भागातून तब्बल २२ मोबाईल हँडसेट चोरले होते. मात्र, एके ठिकाणी तो CCTV मध्ये कैद झाला आणि त्यांचा हा कारनामा (Pune Crime) उघडकीस आला. पुणे पोलिसांच्या (Pune Police Crime Branch) पथकाने त्याचा शोध घेऊन जेरबंद केले.

मुरली नागराज (वय ३५, रा. नागोरी, जि़ शिमोगा, कर्नाटक) असे या चोरट्याचे नाव आहे. शुक्रवार पेठेतील भरत राज पुरोहित यांच्या घरातून व त्यांच्या सहकार्‍यांच्या घरातून मोबाईल चोरीला गेले होते. या ठिकाणी तपास करीत असताना विश्रामबाग पोलीस ठाण्याचे (Vishrambaug Police Station) पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे (PSI Rakesh Sarde) यांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यात मोबाईल चोरी करणारा चोरटा कैद झाला होता. त्यावरुन आरोपीचा शोध सुरु केला. खास बातमीदाराकडून त्यांना माहिती मिळाली की, हा मोबाईल चोरटा कात्रज येथील संतोषनगर (Santosh Nagar, Katraj) परिसरात थांबला आहे. त्यानुसार पोलीस पथकाने संतोषनगर परिसरात त्याचा शोध सुरु केला. तेव्हा तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्यांच्याकडून तब्बल २२ मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आले आहेत. हे मोबाईल त्याने विश्रामबाग, भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth Police Station), वारजे पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) परिसरातील गेल्या काही दिवसांमध्ये चोरले होते.

नागराज हा मुळचा कर्नाटकातील शिमोगा येथील राहणारा असून काही दिवसांपूर्वीच तो गावावरुन पुण्यात आला होता. आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने तो चोर्‍या करीत असे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने (Police Inspector Sunil Mane) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, कर्मचारी संजय दगडे, शरद वाकसे, हेमंत पालांडे, सताप्पा पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

Web Title :- Pune Crime | Captured in CCTV for ‘disappearing’ mobile phones of those who went out for milk in Pune! 22 mobile handsets recover vishrambaug police station Bharti Vidyapeeth police station and warje malwadi police station pune police crime branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

KCR Government | ‘या’ राज्याकडून मोदी सरकारच्या विरुद्ध कृषी कायद्यांबद्दल लढताना प्राण गमावलेल्या 750 शेतकऱ्यांना 3 लाखांची मदत; ‘केसीआर’ यांनी बळीराजाचं ‘मन’ जिंकलं

Pune Crime | अत्यंत दुर्दैवी ! बहिणीच्या आत्महत्येनंतर पत्नीचा खून करणाऱ्या भावाचाही मृत्य; पुणे जिल्ह्यातील घटना

Preity Zinta | आई बनल्यानंतर अभिनेत्री प्रिती झिंटा करणार बाॅलिवूडमध्ये ‘कमबॅक’; या रोलमध्ये दिसणार

Crime News | धक्कादायक ! पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळुन पतीची आत्महत्या; 5 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या 2 हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज,
गेल्या 24 तासात 833 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी