Pune Crime | कार चालकास विवस्त्र करून लुटले ! सिंहगड रस्ता, हिंगणे, नवले ब्रिज परिसरात वाहन चालकांना लुटणार्‍या 5 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हिंगणे चौकातून एका कारचालकास जबरदस्तीने उचलून त्यास स्मशानभुमी शेजारी नेऊन विवस्त्र करून लुटणार्‍या 5 जणांच्या टोळीला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime)

विनोद शिवाजी जामदारे (32, रा. जाधवनगर, वडगांव), रोहित विकास शिनगारे (19, रा. जुनी म्हाडा कॉलनी, हडपसर), विशाल विठ्ठल रणदिवे (22, रा. बार्शी, जि. सोलापूर), गौरव गंगाधर शिंदे (रा. मु.पो. ताडसौदने, ता. बार्शी, जि. सोलापूर) आणि नितीन सुरेश जोगदंड (35, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. (Pune Crime)

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. 20) पोलिसांचे पथक पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास नवले ब्रिज परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एका कारचालकाने त्यांना सांगितले की, माझी चारचाकी भाडेतत्वावर असून दीड वाजण्याच्या सुमारास दोघांनी हिंगणे चौकाजवळ मारहाण केली तसेच गाडीमध्ये कोंबून इतर साथीदारांना बोलावले. हिंगणे स्मशानभुमी जवळ नेल्यानंतर त्यांनी मला विवस्त्र करून लुटल्याची हकीकत त्याने सांगितले. आरोपींनी त्याच्याकडील 2200 रूपये आणि मोबाईल काढून घेतला तसेच त्याला घरून 50 हजार रूपये मागव अशी धमकी दिली.

आरोपींच्या गाडीमधील पेट्रोल संपले होते. त्याचा फायदा घेत कारचालकाने तेथून पळ काढला आणि पोलिस चौकी जवळ करण्यासाठी निघाला असता त्यास पोलिस पेट्रोलिंग गाडी दिसली. त्याने गस्तीवरील पोलिसांना हकीकत सांगितले. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक निरीक्षक राहुल पाटील यांनी तपासास सुरूवात केली. आरोपी हे कात्रज रोडवरील बीपी पेट्रोल पंपासमोरून पळून जात असताना पोलिस पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

अटक आरोपींपैकी विनोद जामदारे याच्याविरूध्द सिंहगड रोड, दत्तवाडी, वारजे माळवाडी येथून खून, दरोडा, खंडणी यासारखे 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. गौरव शिंदे याच्याविरूध्द बार्शी पोलिस ठाण्याच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे तर नितीन जोगदंड याच्याविरूध्द दत्तवाडी पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Jt CP Sandeep Karnik), अप्पर आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
उपायुक्त सुहेल शर्मा (Suhail Sharma IPS), सहाय्यक आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar),
वरिष्ठ निरीक्षक शैलेश संख्ये (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पो.नि. (गुन्हे) जयंत राजुरकर (Police Inspector Jayant Rajurkar), सहाय्यक निरीक्षक राहुल यादव
(API Rahul Yadhav), दिपक कादबाने (API Deepak Kadbane), सहाय्यक उपनिरीक्षक कुरळे, उत्तेकर,
पोलिस हवालदार केकाण, अमित साळुंके, पोलिस अंमलदार देवा चव्हाण, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर यांच्या पथकाने केली आहे.

Web Title :- Pune Crime | Car driver stripped and robbed! 5 people were arrested for robbing motorists in Sinhagad Road, Hingane, Navale Bridge area Sinhagad Raod police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानची चाहत्यांना गुडन्यूज; लवकरच होणार….

Nana Patole | खोटारडेपणा अन् चेष्टा हाच भाजपचा खरा चेहरा – नाना पटोले

MP Sanjay Raut | संजय राऊतांच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली, म्हणाले-‘संजय राऊत हा…’