Pune Crime | ‘आरटीओ’समोर आंदोलन करणार्‍या ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या 190 रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ओला (Ola), उबेर (Uber) यांच्या बाईक टॅक्सी बंद कराव्यात, या मागणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर Regional Transport Office (RTO) रस्ता अडवून आंदोलन (Protest) करणार्‍या बघतोय रिक्षावाला संघटनेच्या कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police) गुन्हा दाखल (FIR) केला आहे (Pune Crime).

 

बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर (Dr. Keshav Nana Kshirsagar) व त्यांचे इतर १८९ कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात विना परवाना बाईक टॅक्सी (Bike Taxi) सुरु करण्यात आली आहे.
त्यांच्यावर आरटीओ (RTO) कारवाई करत असली तरी त्यांचे अ‍ॅप बंद करावे, अशी मागणी बघतोय रिक्षावाला संघटनेकडून (Baghtoy Rikshawala Association) गेल्या १ महिन्यांपासून सुरु आहे.
संघटनेने शनिवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून सायंकाळी पावणे सहा वाजेपर्यंत आर. टी. ओ समोर आंदोलन केले (Pune Crime) होते.

त्यामुळे आर. टी. ओ चौकातून जहांगीर हॉस्पिटलकडे (Jehangir Hospital) जाणारा रस्ता पूर्णपणे अडवून वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता.
संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी विनापरवाना लाऊड स्पिकर लावून त्यावरुन भाषणे करुन मोठमोठ्या घोषणाबाजी करुन रुबी हॉल (Ruby Hall), जहांगीर हॉस्पिटल, एन.एम. वाडिया हॉस्पिटल (N. M. Wadia Hospital)
या महत्वाचे हॉस्पिटलकडे जाणारा महत्वाचा रस्ता अडविल्याने हॉस्पिलकडे जाणार्‍या रुग्णवाहिन्यांना लांबच्या रस्त्याने जावे लागत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांच्या जिवीतास धोका होऊ शकतो,
याची जाणीव असतानाही त्यांनी रस्ता अडवून नागरिकांची गैरसोय केली.
आंदोलनाच्या वेळी त्यांनी सामाजिक अंतर न पाळता विनामास्क आंदोलन करुन शासकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता अवमान केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Case filed against 190 rickshaw pullers of Baghtoy Rikshawala Association protesting in front of RTO

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा