Pune Crime | पती-पत्नीच्या वादात ‘डिलिव्हरी’ बॉयवर गुन्हा दाखल; जबरदस्तीने पार्सल देण्याचा केला प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पती पत्नीमध्ये न्यायालयात (Court) वाद सुरु असताना घरी आलेले पार्सल घेण्यास नकार दिल्याने ते जबरदस्तीने घरात येऊन ते देण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन एका डिलिव्हरी बॉयवर (Delivery Boy) मात्र गुन्हा (FIR) दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आली. (Pune Crime)

 

या प्रकरणी बावधनमधील पाटीलनगर येथे राहणार्‍या एका ३६ वर्षाच्या महिलेने हिंजवडी पोलिसांकडे (Hinjewadi Police) फिर्याद (गु. रजि. नं. ६८६/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी २५ वर्षाच्या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह पाटीलनगरमध्ये राहतात.
त्या एका सॉफ्टवेअर कंपनीत (Software Company) नोकरी (Job) करतात. त्याचे पतीसोबत वाद असून त्यांनी घटस्फोटासाठी (Divorce) न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्या शुक्रवारी सकाळी घरी असताना सिक्युरिटी गेटवरुन फोन आला. अ‍ॅमेझान कंपनीचे पार्सल आले आहे. तेव्हा त्यांनी आपण कोणतेही पार्सल मागविले नाही. कोणालाही घरात पाठवू नका, असे सांगितले.

 

त्यानंतर काही वेळाने एक जण वर आला. त्यांच्या घराची बाहेरील कडी काढून आतील कडी काढण्याचा प्रयत्न करु लागला.
तेव्हा त्यांनी दरवाजाचे आतील लॉक लावून पुन्हा गेटवरील सिक्युरिटीला फोन लावून विचारल्यावर त्याने आपण ओळखीचा आहे,
असे सांगून आत गेल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांनी आरडा ओरडा केल्यावर बाजूच्या लोकांनी येऊन या डिलिव्हरी बॉय याला पकडले.
पोलिसांना बोलावले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर फिर्यादी यांच्या पतीने आपल्या मुलीच्या नावाने एक पार्सल पाठविले होते.
त्या घेत नसल्याने परत घेऊन जाण्याऐवजी त्याने घरात डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न केला.
पती पत्नीच्या भांडणात डिलिव्हरी बॉयवर मात्र गुन्हा दाखल झाला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Case filed against delivery boy in dispute between husband and wife; An attempt was made to forcefully deliver the parcel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | खरी शिवसेना कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश

 

Pune Rape Case | धक्कादायक ! महाविद्यालयीन तरुणीला पळवून नेऊन बलात्कार; कर्वे रोडवरुन चाकणला नेऊन केला अत्याचार