Pune Crime | ‘मी अहमदाबाद सिपी विजयसिंग बोलतोय, कृष्ण प्रकाश माझे मित्र आहेत’ ! पिंपरी पोलिस आयुक्तालयातील निरीक्षकाला ‘डायरेक्ट’ पैशांची मागणी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मी अहमदाबाद ‘सीपी’ विजयसिंग बोलतोय… माझ्या मोबाईल क्रमांकावर पेटीएम, गुगल पे कर असे सांगून एका पोलीस निरीक्षकालाच (Police Inspector) गंडा (Fraud) घातल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड परिसरातील एका पोलीस निरीक्षकाला भामट्याने गंडा घातल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार 8 ते 28 डिसेंबर या कालावधीत घडला आहे.

 

याप्रकरणी पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (Police Inspector Devendra Chavan) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad police station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार खान (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपीने काहीजणांना आपण पोलिसांचा बातमीदार असल्याचे सांगून गंडवल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्यासह इतर पोलिसांना फोनवर आपण अहमदाबाद सीपी विजयसिंग बोलत आहे, असे सांगितले. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) हे आपले मित्र असल्याची सांगितले. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानुसार देवेंद्र चव्हाण आणि इतर पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलवर पेटीएम, गुगल पे द्वारे 24 हजार रुपये पाठवले. परंतु, त्यांच्या बोलण्यावरुन संशय आल्याने चव्हाण यांनी पैसे देण्यास नकार देऊन चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | case filed against the one person to cheating police inspector pimpri chinchwad with the name of CP Krishna Prakash

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rule Change | 1 जानेवारीपासून LPG सिलेंडरच्या दरापासून डिजिटल पेमेंटच्या नियमापर्यंत होणार ‘हे’ 13 मोठे बदल; जाणून घ्या

 

Pune Crime | ‘बहिणीच्या घरी नेऊन 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार’, अश्पाक बागवानला 10 वर्षे सक्तमजुरी; कोंढव्यात दाखल होता गुन्हा

 

Pune Crime | पुण्याच्या औंधमध्ये नाना गायकवाडनंतर आणखी एक सावकारीचे मोठे ‘मॅटर’ उघडकीस ! पुणे पोलिसांकडून 5 कोटीच्या प्रकरणात नाना वाळकेसह दोघांना अटक

 

Pune Crime | पुण्यात शिवप्रतापदिनी चिथावणीखोर भाषण, 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ! समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे व अकोल्याचे कालीचरण महाराज यांच्यासह 6 जणांवर FIR

 

Pune Crime | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल; 32 वर्षीय महिलेची पोलीस ठाण्यात धाव, प्रचंड खळबळ

 

Gold Price Today | खुशखबर ! स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे घसरले दर, जाणून घ्या नवीन दर