Pune Crime | पुण्यातील हिट अँड रन घटना CCTV मध्ये कैद, व्यावसायिकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यामध्ये हिट अँड रनची (Hit and Run) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीच्या (Person) अंगावर कारचालकाने गाडी घातल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. धक्कादायक म्हणजे दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेकडे त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे व्हिडिओत (Pune Crime) दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यावसायिकाविरूध्द गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

ही घटना पुण्यातील (Pune Crime) सॅलिसबरी पार्कमध्ये (Salisbury Park) 20 एप्रिल रोजी घडली आहे. या घटनेच सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) एका व्यावसायिकाविरूध्द चार दिवसांनी गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली. मात्र, त्यानंतर लगेच त्यांना जामिनावर सोडण्यात (Released on Bail) आले.

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कार फुटपाथच्या बाजूला झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरुन जात असल्याचे दिसत आहे.
त्यावेळी गाडी पुढे घेताना अंदाज न आल्याने त्या व्यक्तीच्या अंगावरुन गाडी नेली. या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मृत व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला.
त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे पसार झालेल्या कार चालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली.

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे व्हिडिओत पहायला मिळत आहे.
ये जा करणाऱ्या लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
मात्र, मृत व्यक्तीच्या शेजारी बसलेल्या कुत्र्याने त्या व्यक्तीच्या अंगावरुन कार गेल्यानंतर कारच्या दिशेने धाव घेतल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

 

Web Title :- Pune Crime | case has been registered against a businessman in pune for driving a four wheeler on a person

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uniform Civil Code | समान नागरी कायदा मुस्लिम स्वीकारणार नाहीत; ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, सांगितलं कारण

 

Pune Municipal Corporation (PMC) | अतिक्रमण कारवाई करताना ‘पंचनामा’ करणे शक्य नाही ! पालिकेच्या गोदामात चोर्‍या होतात परंतू…

 

PMC Cut Illegal Water Connections | अतिक्रमण कारवाईनंतर पाणी पुरवठा विभागाचा झटका ! डी.पी. रस्त्यावरील हॉटेल्स, मंगल कार्यालयातील 15 बेकायदा नळ कनेक्शन महापालिकेने तोडली