Pune Crime | १९ वर्षीय तरूण सहकार्‍यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे प्रकरण ! यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशीसह 5 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीत (yash jyoti debt consultancy pvt ltd pune) काम करणार्‍या एका १९ वर्षीय तरूणास आत्महत्या (Suicide) करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशी (Manager Aishwarya Joshi) यांच्यासह ५ जणांविरूध्द मुंढवा पोलिस ठाण्यात (Mundhwa Police Station) गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

आशिष व्यंकट कामनबोयना  Ashish Venkat Kamanboyna (१९, रा. सर्व्हे नं. ७१, बालाजीनगर, लेन नं. १, घोरपडी गाव, पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
ऐश्वर्या जोशी ( Aishwarya Joshi) ,  महिंद्र सागर ( Mahendra Sagar), रोहन मस्करा (Rohan Mascara), सुनिल जाधव (Sunil Jadhav) आणि जोशी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.
यासंदर्भात सुजाता व्यंकट कामनबोयना (३६) यांनी फिर्याद दिली आहे.
आशिषने दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली आहे.

Gold Silver Price Today | दिवाळीआधी खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या

याबाबत अधिक माहिती अशी की, आशिष काम करत असलेल्या यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीमधील त्याचे ग्राहकाचे ३० हजार रूपये त्याचा मित्र नितीन कुमार याचे खात्यावर घेवुन ती त्याने खर्च केली.
कंपनीचे पैसे खर्च केल्याचे मॅनेजर ऐश्वर्या जोशी यांना माहित झाले.
त्यानंतर आशिष आणि फिर्यादी यांनी ती रक्कम कंपनीमध्ये जावुन भरली.

रक्कम डिपॉझिट केल्यानंतर देखील ऐश्वर्या जोशी, महिंद्र सागर, रोहन मस्करा, सुनिल जाधव आणि जोशी यांनी
आशिष यास दररोज कंपनीमध्ये बोलावुन अजुन रक्कम घेतल्याची भिती घालुन त्याचा मानसिक छळ केला आणि त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
मुंढवा पोलिसांनी तक्रार (Pune Crime) प्राप्त झाल्यानंतर कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशी यांच्यासह महिंद्र सागर,
रोहन मस्करा, सुनिल जाधव आणि जोशी यांच्याविरूध्द भादंवि ३०६ (आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी (senior police inspector bramhanand naikwadi)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक माने हे अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे मनपाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी महापौर दिल्लीत; मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

Pune Crime | पुण्यातील भाजप नगसेवक धनराज घोगरे यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल; एका वकिलासह 5 जणांचा समावेश, प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Case of incitement of 19 year old youth colleague to commit suicide! A case has been registered against 5 persons including Aishwarya Joshi, manager of  yash jyoti debt consultancy pvt ltd pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update