पुण्यातील माजी नगरसेवकाच्या दोन मुलांना गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरूणाचा खून केल्याप्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांच्या दोन मुलांना शिवाजीनगर येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

चेतन तानाजी निम्हण आणि तुषार तानाजी निम्हण अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. एप्रिल 2013 मध्ये चेतन आणि तुषार यांनी भावकीतील वादातून प्रतिक रामभाऊ निम्हण (19) याचा गोळया झाडून खून केला होता. पोलिसांनी याप्रकरणी 7 जणांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला होता. खून प्रकरणी पोलिसांनी काही जणांना तात्काळ अटक केली होती तर चेतन आणि तुषार हे दोघे फरार झाले होते. त्यांना नंतर अटक करण्यात आली होती. सन 2013 पासुन हे प्रकरण चालु होते. अखेर आज शिवाजीनगर येथील न्यायालयाने चेतन आणि तुषार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –