पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील महंमदवाडी (Mahammadwadi) परिसरातील सोसायटीत एका व्यक्तीने रागाच्या भरात सातव्या मजल्यावरून दीड महिन्याचे मांजरीचे पिल्लू (Kitten) फेकून दिले. यामध्ये पिल्लाचा जागीच मृत्यू (Death) झाला असून, संबंधित व्यक्तिविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Solice Station) सोमवारी रात्री (दि.30) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पवन वासवाणी Pawan Vaswani (रा. महंमदवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे (Pune Crime) नाव आहे.
वासवाणी विरोधात आयपीसी 429 प्रमाणे प्राण्यांना क्रुरतेने वागवल्याप्रकरणाच्या (Treating Animals Cruelly) कलम 11 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत 30 वर्षाच्या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आहे. तक्रारदार व आरोपी वासवानी हे एकाच सोसायटीत राहतात. 29 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दीड महिन्याचे मांजराचे बेवारस पिल्लू हे सोसायटीच्या सातव्या मजल्यावर फिरत होते. त्यावेळी मोकळ्या डकच्या जाळीच्या ठिकाणी ते अडकले.(Pune Crime)
आरोपीने मांजराच्या पिल्लाला डकच्या जाळीतून बाहेर काढून ते लिफ्टच्या बाजूला असलेल्या मोकळ्या डकमधून सातव्या मजल्यावरून खाली फेकले. यामध्ये मांजराचे पिल्लू गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. मोहिते (API S. Mohite) करित आहेत.
महिनाभरापूर्वी गोखलेनगर भागात घरात शिरलेल्या एका पाळीव मांजराला शेजाऱ्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
Web Title : Pune Crime | cat thrown from 7th floor of Society, FIR in Hadapsar police station
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर
लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त