Pune Crime | पुण्यातील ‘त्या’ कार्यकर्त्याला पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी सीबीआयने केली अटक

पुणे : Pune Crime | पश्चिम बंगालमधील (West Bengal) विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यातून गेलेल्या एका कार्यकर्त्याला सीबीआयने (CBI)खुन प्रकरणात पुण्यातून अटक केली आहे. सीबीआयचे पथक त्याला घेऊन पश्चिम बंगालला रवाना झाले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर नादिया जिल्ह्यातील कोलवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात उसळलेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यु झाला होता. याप्रकरणात  १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी एकाला पुण्यातून अटक (Pune Crime) करण्यात आली.

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यातून काही कार्यकर्ते गेले होते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमावार हिंसाचार झाला. या हिंसाचार प्रकरणात भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी हिंसाचार भडकविल्याचा एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले होते. कोलकत्ता उच्च  न्यायालयाने हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. या हिंसाचार प्रकरणात  ३५ हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत.

या प्रकरणात आरोपींनी धारदार खंजीर, कूपनलिकेचा पाईप, लोखंडी रॉड आणि अग्निशस्त्रासह फिर्यादीच्या घरात शिरले. त्यांनी तक्रारदाराच्या घराची तोडफोड केली. त्यांच्या पतीला बाहेर खेचले. एकाने त्यांच्या पतीच्या डोक्यात गोळी झाडली. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. त्यांनी पतीला शक्तीनगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. १४ जून रोजी याप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर एक जण पुण्यात वास्तव्याला असल्याची माहिती मिळाल्यावर सीबीआयचे पथक पुण्यात आले होते. त्यांनी एकाला ताब्यात घेतले. अटक करुन मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून ४ दिवसांची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) घेऊन आरोपीला पश्चिम बंगालला घेऊन गेले. याप्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक (Pune Crime) करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयने नुकतेच १० आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले आहे़.

हे देखील वाचा

BJP-MNS Alliance | ‘या’ 4 निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार? शिवसेनेची चिंता वाढली?

Pune ACP Transfer | बारामतीहून आयुक्तालयात हजर झालेले ACP नारायण शिरगांवकर यांची पुणे शहरात ‘या’ ठिकाणी नियुक्ती

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,029 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | CBI arrested one from pune in west bengal violence case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update