Advt.

Pune Crime | पुण्यात टिळक रस्त्यावर भरदिवसा तरुणीसमोर ‘हस्तमैथून’ करणारा CCTV त कैद, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तरुणीकडे पाहून हस्तमैथुन (Masturbation) करणाऱ्या तरुणाविरुद्ध पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती तपास अधिकरी सहायक पोलीस निरीक्षक प्रतिक्षा शेंडगे (API Pratiksha Shendge) यांनी दिली. हा प्रकार सोमवारी (दि.10) सकाळी अकराच्या सुमारास पुण्यातील (Pune Crime) शास्त्री रोड (Shastri Road) परिसरात घडला आहे.

 

पुण्यातील (Pune Crime) सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) स्पर्धा परीक्षेच्या विद्यर्थीनीचा भररस्त्यात विनयभंग (Molestation Case) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने पीडित तरुणीकडे पाहून हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल केला. पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. यामध्ये एक तरुण पीडित मुलीकडे पाहून हस्तमैथुन करत असल्याचे दिसत आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून त्याला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

याबाबत नवी पेठत राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास (Competitive Exam Study) करते.
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मैत्रिणीसोबत शास्त्री रस्त्यावरुन टिळक रोडने (Tilak Road) जात होती.
त्यावेळी चिंतामणी इमारतीसमोर अचानक एका तरुणाने हस्तमैतुन करण्यास सुरुवात केली.
तसेच त्यांच्याकडे पाहून अश्लिल बोलण्यास सुरुवात केली.
यामुळे घाबरलेल्या तरुणीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत अनोळखी तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रतिक्षा शेंडगे करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | CCTV captures man who ‘masturbates’ in front of a young woman on Tilak Road in Pune all day long, police search for accused

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Retired ACP Rajendra Bhamre | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांना मातृशोक

 

Post Office Small Savings Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 333 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला देईल 8.22 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या कशी

 

Maharashtra Police Transfer | वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय व्हायरल, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

 

Multibagger Penny Stock | एक रुपयांच्या स्टॉकने अवघ्या 1 वर्षात दिला 7000% रिटर्न, रू. 1 वरून वाढून झाला रू. 71 चा, तुमच्याकडे आहे का?