Pune Crime | पालखी दर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसुत्र लांबविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी (Sant Dnyaneshwar Palkhi Sohala) आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र एका तरुणीने हिसका (Chain Snatching) मारुन चोरुन नेले. विश्रांतवाडी चौक येथे बुधवारी दुपारी पावणेतीन वाजता ही घटना घडली. (Pune Crime)

 

याबाबत वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील एका ४८ वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७५/२२) दिली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरटे महिलांच्या दागिन्याना लक्ष्य करताना दिसतात. विश्रांतवाडी परिसरात तीन महिलांच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविले होते. येरवड्यातील इंदिरानगरमधील (Indira Nagar, Yerwada, Pune) दत्त मंदिरासमोर हा प्रकार घडला होता. (Pune Crime)

 

फिर्यादी या संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी विश्रांतवाडी चौकात थांबल्या होत्या. पालखीचे दर्शन घेताना झालेल्या गर्दीत एका तरुणीने त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाचे ४९ हजार रुपयांचे मंगळसुत्र हिसकावून चोरुन नेले. सहायक पोलीस निरीक्षक माळी अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Chain Snatching In Vishrantwadi Chowk Yerwada Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा