Pune Crime | अघोरी कृत्य ! वंशाचा दिवा हवा म्हणून मांत्रिकाच्या सांगण्यावरुन महिलेला विवस्त्र करुन शरीरावर लावला अंगारा, हळदी-कुंकू

पुणे / चाकण : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | लग्नानंतर दोन्ही मुली झाल्याने वंशाला दिवा हवा म्हणून पती आणि सासू या दोघांनी मिळून एका मांत्रिकाच्या सांगण्यावरुन विवाहितेला विवस्त्र करुन अंगारा आणि हळदीकुंकू (turmeric kunku) शरीराला लावण्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्हयातील (Pune Crime) खेडमध्ये (Khed) समोर आला आहे. हे अघोरी कृत्य खेड तालुक्यातील खालुंब्रे येथे घडले आहे. याप्रकरणी पती, सासू आणि भोंदूबाबाच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला दोन मुली झाल्या होत्या. या कारणावरुन तसेच लग्नामध्ये फिर्यादीच्या आई-वडिलांनी मानपान केला नसल्याच्या कारणावरून आरोपींनी विवाहितेचा छळ केला. तसेच वेळोवेळी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली. वंशाला दिवा हवा असा पती आणि सासूचा आग्रह होता. त्यामुळे ते विवाहितेवर अत्याचार करत होते.

पती आणि सासू दोघे मावळ तालुक्यातील कामशेत (Kamshet) येथे एका भोंदूबाबाकडे (Bhondubaba) पीडितेला घेऊन गेले. भोंदूबाबा समोर महिलेला बसवण्यात आले. बाबाने हातातील कवड्या जमिनीवर टाकून तोंडाने मंत्र पुटपुटत हिशेब केल्याचे हातवारे केले. मुलगा होण्यासाठी महिलेला अंगारा खाण्यास दिला. तसेच काही अंगारा कागदामध्ये बांधून दिला.

भोंदूबाबाने सांगितल्याप्रमाणे पती आणि सासूने महिलेला विवस्त्र केले.
त्यानंतर पीडित फिर्यादीच्या शरीरावर अंगारा व हळदीकुंकू लावले.
आपल्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे महिला खूप घाबरली.
त्यामुळे तिने खेड तालुक्यातील महाळुंगे पोलीस चौकीत (mahalunge police chowki) धाव घेतली.
आपल्या सोबत घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आरोपींवर जादूटोणा प्रतिबंधक कायदा (Witchcraft Prevention Act) कलम तीन नुसार तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Web Title : pune crime | chakan khed crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update