Pune Crime | संगणक अभियंता महिलेची टिंगल करणं पडलं महागात, उच्चशिक्षित दोन तरुणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महिलांची टिंगल (Harassing Women) करणे पुण्यातील दोन उच्चशिक्षित तरुणांना (Highly Educated Youth) चांगलेच महागात पडले आहे. खराडी (Kharadi) भागातील महिलांची टिंगल करुन पळून गेलेल्या दोघांचा चंदननगर पोलिसांनी (Chandannagar Police) सीसीटीव्हीच्या आधारे  माग काढून बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. पोलिसांनी (Pune Police) परिमल जोशी (Parimal Joshi) आणि निखिल पाटील (Nikhil Patil) यांना अटक (Pune Crime) केली आहे.

 

याबाबत एका 42 वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी परिमल जोशी (वय – 28 मूळ रा. माजलगाव – Majalgaon, जि. बीड) आणि निखील पाटील (वय – 29 मूळ रा. चोपडा, जि. जळगाव -Jalgaon) यांना अटक केली आहे. हा प्रकार 1 मे रोजी घडला आहे. (Pune Crime)

 

तक्रारदार महिला संगणक अभियंता (Computer Engineer) असून त्या 1 मे रोजी मैत्रिणी समवेत धावण्याचा सराव करीत होत्या. त्यावेळी खराडीतील गेरा इम्पेरियम अल्फा सोसायटीसमोर (Gera Imperium Alpha Society) दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धावणाऱ्या महिलांची टिंगल केली आणि पळून गेले. महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) सर्व घटना चित्रीत झाली होती.

सीसीटीव्हीमध्ये दुचाकीचा क्रमांक मिळाला. त्या आधारे पोलिसांनी तपास करुन आरोपी ज्या ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून राहत होते. त्या ठिकाणचा पत्ता पोलिसांनी मिळवला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी हे एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत असल्याची माहिती मिळाली. घटनेच्या एक दिवस आधी दोघांनी रात्रभर दारु प्यायली होती. सकाळी उठल्यानंतर दोघे दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी आरोपींनी महिलांना पाहून त्यांची टिंगल केली. महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर ते दुचाकीवरुन पळून गेले.

 

ही कारवाई चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव (Senior Police Inspector Sunil Jadhav),
पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील थोपटे (Police Inspector Sunil Thopte),
सहायक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे (API Manohar Sonawane), पोलीस उपनिरीक्षक दिलीप पावले (PSI Dilip Pavle),
सचिन कुटे, विक्रांत सासवडकर, सुभाष आव्हाड, संदीप येळे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | chandannagar police arrest two higher educated youngster harassing women in pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा