Pune Crime | तरुणीला ‘क्या माल है’ म्हणत केला विनयभंग, चंदननगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सकाळी मॉर्निंग वॉककरिता जात असलेल्या तरुणीला ‘क्या हाल है’ असे म्हणत विनयभंग करणाऱ्या तरुणाला चंदन नगर पोलिसांनी बेड्या (Pune Crime) ठोकल्या आहेत. हा प्रकार शेजवळ पार्क लेन, खराडी येथे घडला.

यश दीपक डाडर (वय 24, रा. बोराटे वस्ती, खराडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी सकाळी शेजवळ पार्क लेन येथून पहाटे मॉर्निंग वॉक करिता जात होती. त्यावेळी आरोपी डाडर हा स्कूटी वरून तिच्यासमोर आला.

तिला न्याहाळत ‘क्या माल है’ असे म्हणून तिच्या जवळ येत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या तरुणीने त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता तिला शिवीगाळ करीत माझ्या भावाला घेऊन येतो आणि तुझ्याकडे बघतो अशी धमकी दिली. याप्रकरणी चंदनगर पोलीस (Chandannagar Police) पुढील तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | ‘तुम्हीच शहरातील रस्त्यांवरील खड्डयांची यादी द्या’ ! महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी जबाबदारी झटकली; पुणे मनपा ‘निर्णायकी’ अवस्थेत

Gold Price Today | सोन्यात जबरदस्त वाढ, चांदी सुद्धा महागली; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | तडीपार गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी केले अटक

Rain in Maharashtra | विकेंडनंतर राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Fact Check | Tokyo Olympics मध्ये ‘गोल्ड मेडल’ जिंकण्याच्या खुशीमध्ये भारत सरकार देतंय 12 महिन्यांचा Free Recharge? जाणून घ्या ‘सत्य’