Pune Crime | विनयभंग करणाऱ्या आरोपीला चंदननगर पोलिसांकडून शेगाव येथून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महिलेचा विनयभंग (Molestation Case) करुन फरार झालेल्या आरोपीला चंदननगर पोलिसांनी शेगाव (Shegaon) येथुन अटक (Arrest) केली आहे. अब्दुल वाहिद शेख Abdul Wahid Sheikh (रा. माळीवाडी, पाचपीरचावडी, अहमदनगर-Ahmednagar) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) IPC 354 (अ), 500, 506, आयटी अ‍ॅक्ट (IT ACT) अन्वये गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी चंदननगर पोलीस ठाण्यातील तपास पथक (Investigation Team) रविवारी (दि.8) अहमदनगर येथील त्याच्या राहत्या घरी गेले होते. मात्र, आरोपी सापडला नाही. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करुन आरोपी अब्दुल शेख याला सोमवारी (दि.9) शेगाव येथुन अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल थोपटे (Police Inspector Sunil Thopte) करीत आहेत.(Pune Crime)

ही कारवाई चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव (Senior Police Inspector Sunil Jadhav), पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पावले (PSI Dilip Pavle), पोलीस अंमलदार नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, अविनाश संकपाळ, तुषार भिवरकर, महेश नाणेकर, श्रीकांत शेडे, अतुल जाधव, राहुल इंगळे, अमित कांबळे, गणेश हांडगर, विक्रांत सासवडकर यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Chandannagar police arrested the accused from Shegaon in molestation case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला