Pune Crime | गैरसमजातून दुकान पेटवून देणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल; हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीने मोटारसायकल जप्त केली. तरुणाने सांगितल्यामुळे कंपनीने गाडी नेली असा गैरसमज करुन चौघांनी हडपसर (Hadapsar) भाजी मंडईतील दुकानाला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत भाजीपाला व फळाचे दोन दुकाने तसेच शेजारील तीन दुकानांचे नुकसान झाले आहे. (Pune Crime)

याप्रकरणी मयुर किसन फडतरे (वय ३२, रा. रामोशी आळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन राज चौधरी, रौफ बागवान, अर्जुन ऊर्फ टोण्या व फैज्या आणि बागवान लातुरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी राज चौधरी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. राज चौधरी याने मयुर याच्या नावावर एक मोटारसायकल खरेदी केली. मात्र, त्याने हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीने त्यांची मोटारसायकल नेली होती. परंतु, आरोपी यांना फिर्यादी यांनीच फायनान्सवाल्यांना गाडी दिली असल्याचा गैरसमज झाला. त्यांनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून फिर्यादी याला तुझी वाट लावतो, अशी धमकी दिली होती. फिर्यादी यांचे हडपसर भाजी मंडई (Hadapsar Mandai) येथे भाजीपाला व फळाचे दोन दुकाने आहेत. आरोपींनी त्या दुकानांना ३१ जानेवारी रोजी रात्री आग लावली. त्यात त्यांच्या दोन दुकानांबरोबर शेजारील चंद्रकला गवळी, अक्षय भिसे व धोंडाबाई पांढरे यांच्या दुकानाला आग लागली. त्यात ६० हजार रुपयांचे नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Pune Crime | Charges filed against four persons for setting shop on fire due to misunderstanding; Incidents in Hadapsar area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’