Pune Crime | रघुनाथ येमूलच्या दरबारात राजकीय दिग्गज, प्रशासकीय अधिकारी लावतात हजेरी; गुरुजींच्या अटकेनंतर प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online)- palmist Raghunath Yemul | औंधमधील (aundh) प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेचे पायगुण चांगले नाहीत, तिच्यापासून सोडचिठ्ठी घे असा सल्ला देऊन तिच्या छळाला कारणीभूत झालेल्या आध्यामिक गुरु आणि ज्योतिषाचार्य रघुनाथ येमूल (palmist Raghunath Yemul)  यांना चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshrungi police station) अटक (Arrest) केल्याने पुणे शहरा (Pune city) त एकच खळबळ उडाली आहे. येमूल गुरुजी (palmist Raghunath Yemul)  यांच्या दरबारात राजकीय नेते, कार्यकर्ते तसेच प्रशासकीय अधिकारी नित्य नेमाने हजेरी लावत असतात. त्याचबरोबर येमूल गुरुजी (palmist Raghunath Yemul) यांचा भक्तवर्गही मोठा आहे. त्यामुळे पोलिसांनी अटक केल्याचे समजल्यावर त्यांच्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरु केले होते. अनेकांनी चक्क त्यांना ज्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी शनिवारी रात्रीपासून येरझर्‍या घालण्यास सुरुवात केली होती.

रघुनाथ येमूल (palmist Raghunath Yemul) यांनी सिद्धी कार्मयोगी फाऊंडेशन (Siddhi Karmayogi Foundation) ची स्थापना केली असून ते या फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. गोसेवा शोध केंद्रा (Goseva Research Center) चे कन्व्हेअर आहेत. ते स्वत:ला ‘ज्योतिषाचार्य’ तसेच ‘ध्यानगुरु रघुश्री’ म्हणवून घेतात.

ध्यानगुरु रघुश्री या नावानेच त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
त्यांंनी स्वत:चा नीति सम्प्रदायही सुरु केला आहे.
सोशल मिडियाद्वारे ते रोजच्या दिवसाचे महत्व व शुभ मुहूर्त असे सांगत असतात.
त्यांच्याकडून आपला हात पाहण्यासाठी अपॉईटमेंट घ्यावी लागते.
केवळ हात पाहण्यासाठी काही हजार रुपये मोजावे लागतात.
हात पाहण्याचा हा कार्यक्रम जवळपास एक तास चालतो.
त्यातून ते त्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढतात.

औंध (aundh) मधील गायकवाड कुटुंबही त्यांचे भक्त बनले. त्यानंतर ते सांगतील, त्याप्रमाणे वागू लागले. त्यातूनच एका सुनेचा छळ होण्यात झाला.
शारीरिक व मानसिक अत्याचार करण्याबरोबरच अमानुष मारहाण केल्याप्रकरणी गायकवाड कुटुंबातील ८ जणांविरुत्र चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshrungi police station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
ही घटना २३ जानेवारी २०१७ पासून सुरु होती. रघुनाथ येमूल यांनी गणेश गायकवाड याला तुझी पत्नी पांढर्‍या पायगुणाची आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

तिची जन्मवेळ चुकीची आहे.
तुझी बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तू आमदार, मंत्री होणार नाही. त्यामुळे लवकर सोडचिठ्ठी दे आणि मुलगा तिच्याकडून काढून घे.
मी देतो तो लिंबु तिच्यावरुन उतरुन टाकल्यावर तुझ्या मागची पिडा कायमची निघून जाईल, असे सांगितले होते.
येमूल गुरुजींच्या सांगण्यावर विश्वास ठेवून गायकवाड कुटुंबाने आपल्या सुनेचा छळ केला.
पतीने तिला सिगारेटचे चटके दिले. हा सर्व प्रकार तपासात पुढे आल्याने चतु:श्रृंगी पोलिसांनी रघुनाथ येमूल यांना अटक केली.

रविवारी त्यांना न्यायालयात नेण्यात आले.सरकारी वकील संजय दीक्षित (Public Prosecutor Sanjay Dixit) यांनी सांगितले की, हा गुन्हा महिला अत्याचारा (Exploitation of Women) संदर्भातील असून २१ व्या शतकातही सुनेवर सुशिक्षित व प्रतिष्ठि कुटुंबातील लोक अघोरी कृत्याद्वारे अत्याचार करीत आहेत.
ही गंभीर बाब आहे.आरोपीने फिर्यादीविषयी वाईट बाबी सांगून  सासरच्या लोकांना संसार मोडण्यासाठी संगनमताने कट केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

या गुन्ह्यातील आरोपी केदार गायकवाड (Kedar Gaikwad) आणि राजू अंकुश (Raju Ankush) हे दोघे फरार आहेत.इतरांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. फरार होण्यापूर्वी केदार गायकवाड व आरोपी येमूल हे एकमेकांच्या संपर्कात होते.ते दोघेही तिरुपती बालाजी या ठिकाणी सोबत असल्याचे फोटो उपलब्ध आहे. केदार गायकवाड याची माहिती आरोपीला असून ती घेऊन त्याला अटक करायची आहे.

तसेच फिर्यादी यांच्या बेडरुमच्या बाहेर हळदी कुंकु लावलेल्या टाचण्या मारलेली लिंबु ठेवल्यााचे फिर्यादी सांगत आहे.त्यामध्ये तथ्य आहे का याबाबत आरोपीकडे तपास करायचा आहे, असे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली होती.
चतु:श्रृंगी पोलीस रघुनाथ येमूल यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करतील.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Pune Crime | Chaturshrungi police arrest palmist Raghunath Yemul, on his advised businessman torched wife

 

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील प्रसिध्द ज्योतिषी रघुनाथ येमूलला पुणे पोलिसांकडून अटक,
जाणून घ्या प्रकरण