Pune Crime | पेटीएम कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवुन दुकानदाराची फसवणूक करणारा भामटा पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पेटीएम कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून दुकानदाराला पेटीएमवर कर्ज मंजुर करुन देतो असे सांगून मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम स्वत:च्या खात्यावर जमा करुन फसवणूक केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 

अजित कुमार अक्षयकुमार पटनाईक (सध्या रा. तुळशीनगर, चंदननगर, पुणे, मुळ रा. ओरीसा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात एका दुकानदाराने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरुद्ध आयपीसी 406, 420 आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना पेटीएम साऊंड बॉक्सवर ऑफर असून, जुना बॉक्स देऊन कंपनीकडून नवी बॉक्स घेऊन देतो असे सांगितले. तसेच पेटीएमवरती लोन मंजूर करुन देतो एसे सांगून त्यांचा मोबाईल घेऊन त्यामध्ये फिर्यादी यांचे पेटीएम अकाउंट पोस्टपेड केले. त्यानंतर दहा मिनीटांमध्ये पेटीएमवरुन 35 हजार रुपये लोन मंजूर झाल्यानंतर ही रक्कम स्वत:च्या बँक खात्यात जमा करुन घेतली. दुकानदाराने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीचा चंदननगर परिसरात शोध घेऊन त्यला ताब्यात घेतले.

पोलिसांचे व्यावसायिकांना आवाहन
अशा प्रकारे व्यावयायिक, दुकानदार यांची फसवणुक झाली असेल तर त्यांनी
चंदननगर पोलीस ठाण्याशी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,
असे आवाहन चंदननगर पोलिसांनी केले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त (पूर्व) नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे,
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे,
पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, पोलीस अंमलदार सुरज जाधव,
अजय शेळके, मनोज भंडारी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | cheater, who cheated a shopkeeper by pretending to be a representative of Paytm company, is in the net of Pune police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Assembly Elections 2022-2023 | सन 2022-23 मध्ये तब्बल 11 राज्यांमध्ये निवडणुका, जाणून घ्या इलेक्शन जिंकण्यासाठीचे मोदींचे मिशन

Pune News | विकासाच्या अनुषंगाने वक्फ मालमत्तांच्या सुयोग्य वापराविषयी मुस्लिम समुदाय करणार विचारमंथन

Sania Mirza-Varun Dhawan | वरूण धवनने सांगितला सानिया मिर्झाशी झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा