Pune Crime | झारखंडमधील विद्यापीठ प्रवेश पडला 55 हजारांना; महिलेने घातला गंडा

पुणे – Pune Crime | झारखंडमधील कलिंगा विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेने तरूणाला ५५ हजारांना गंडा घातला. संबंधित विद्यापीठात अ‍ॅडीमशन न करता तिने प्रवेशासाठी घेतलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणुक (Cheating Case) केली आहे. ही घटना सप्टेंबर २०१९ ते मे २०२० कालावधीत घडली. (Pune Crime)

दर्शना प्रकाश जमगाडे ऊर्फ आयेशा मिर्झा (वय-३०,रा.उंड्री) विरूद्ध चंदननगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महेश रामभाऊ पोपळभट (वय-४१,रा.मांजरी, ) यांनी तक्रार दाखल केली आहे. (Pune Crime)

दर्शनाने फोन करून महेश पोपळभट यांच्याशी ओळख वाढविली होती. त्यांना झारखंडमधील कलिंगा विद्यापीठात एफवायबीएचे अ‍ॅडमीशन (Admission In FYBA) करुन देतो असे सांगुन तिने अ‍ॅडमीशनसाठी ५५ हजार रुपये घेतले. त्यांना तुमचे कलिंगा विद्यापीठ झारखंड येथे एफवायबीएचे अ‍ॅडमिशन झाले सांगून मेल आयडीवर प्रश्न पत्रिका पाठवून दिली. संबंधित प्रश्नपत्रिका सोडवून ती दर्शनाकडे जमा करुन निकालाची विचारणा केली. त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे देत फसवणुक केली आहे.

Web Title :- Pune Crime | Cheating case chandan nagar police limits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला? ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळ ठाम, म्हणाले…

Pankaja Munde | ‘सध्या मी बेरोजगार आहे, त्यामुळे…’, पंकजा मुंडेंच्या नव्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण

Ration Card | रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर ! मोदी सरकारने मोफत रेशनसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय