Pune Crime | ज्येष्ठ नागरिकास गुंगीचे औषध देऊन ‘बिंदीया’ने केले 8 लाखाचे दागिने लंपास, कल्याणीनगरमधील घटना

पुणे : Pune Crime | घरकामाचा बहाणा करुन ज्येष्ठ नागरिकास पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन महिलेने ८ लाख ८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वीही घरकामाचा बहाणा करुन एका महिलेने घरातील तिजोरीच चोरुन (Pune Crime) नेली होती. त्यानंतर ही दुसरी घटना आहे.
ही घटना कल्याणीनगरमधील इंद्रस्थ सोसायटीत घडली. फिर्यादी हे घरात बसले असताना बिंदिया असे नाव सांगणारी एक महिला त्यांच्याकडे घरकाम मागण्यासाठी आली होती. त्यांनी तिला घरकामासाठी ठेवून घेतले. फिर्यादी यांनी तिला पिण्यासाठी पाणी मागितले असता तिने पिण्याच्या पाण्यामध्ये कोणतेतरी गुंगीचे औषध टाकून ते त्यांना पिण्यास दिले. पाणी पिल्यानंतर फिर्यादी हे बेशुद्ध झाले. त्यानंतर या महिलेने घरातील ६ लाख ९४ हजार रुपयांचे १३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ लाख १० हजार रुपयांचे प्लॅटिनमचे ब्रेसलेट व ४ हजार रुपये रोख असा ८ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. येरवडा पोलीस (Yerwada Police) अधिक तपास करीत आहेत. घरकाम मागण्यासाठी आलेल्या महिलेने घरात चोरी करण्याचा हा दुसरा प्रकार घडला आहे़ यापूर्वी एका ज्येष्ठ नागरिकांकडे एका महिलेने असेच चार दिवस काम केले व त्यानंतर लाखो रुपयांचे दागिने असलेली इलेक्ट्रॉनिक तिजोरी चोरुन नेली होती.
Earthquake | कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी भुकंपाचा ‘धक्का’
Baramati Accident | दुर्दैवी ! इंदापूर-बारामती राज्यमार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू
PAN-Aadhaar Linking | ‘पॅन-आधार’शी लिंक करण्याबाबत नवीन अपडेट; ‘SEBI’ च्या विशेष सूचना