Pune Crime | पुण्याच्या कोंढाव्यातील आकृती जय डेव्हलपर्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; पैसे घेऊनही फ्लॅट न देता बनावट दस्तावेजाद्वारे पुणे महापालिकेसह ग्राहकाची फसवणुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पैसे घेतल्यानंतरही फ्लॅटचा ताबा न देता बनावट कागदपत्रे तयार करुन पुणे महापालिकेला (Pune Corporation) सादर करुन त्याद्वारे प्रॉपर्टी टॅक्स (Property Tax) काढून ग्राहक आणि महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa News) आकृती जय डेव्हलपर्सच्या (Akruti Jay Developers) मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

 

आकृती जय डेव्हलपर्सचे मालक व्योमेश महिपतराय शहा (Vyomesh Mahipatrai Shah), व्यवस्थापक जस्मीन राठोड (Manager Jasmine Rathod)
आणि अकाऊंटंट अभिषा वैरेनकर (Accountant Abhisha Warenkar) अशी गुन्हा (Pune Crime) दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल मल्लिकार्जुन सिंदगी Amol Mallikarjun Sindagi (वय 37, रा. टिळेकरनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 18 जुलै 2011 ते 12 मार्च 2021 दरम्यान घडला.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल सिंदगी यांनी आकृती जय डेव्हलपर्सच्या कोंढवा येथील प्रकल्पात (Akruti Jay Developers, Kondhwa Project) फ्लॅट खरेदी करण्यासाठी वेळोवेळी 22 लाख 95 हजार 851 रुपये 2011 पासून दिले. असे असतानाही त्यांनी फिर्यादी यांना फ्लॅटचा ताबा दिला (Pune Crime) नाही. तसेच व्यवस्थापक जस्मीन आणि अकाऊंटंट अभिषा यांनी फिर्यादी यांना तुम्हाला तुमचा फ्लॅट मिळू देणार नाही. काय करायचे आहे ते करा अशी धमकी दिली.

 

फिर्यादीबरोबर फ्लॅटचा करारनामा त्यांच्या नावावर झालेला नसतानाही बांधकाम व्यावसायिक शहा (Builder Vyomesh Mahipatrai Shah)
यांनी पुणे महानगर पालिकेला खोटे दस्तऐवज (PMC Fake Documents) सादर करुन ते खरे असल्याचे भासविले.
त्यामुळे महापालिकेने 2017 पासून प्रॉपर्टी टॅक्स (PMC Property Tax) फिर्यादीच्या नावाने काढले.
फिर्यादी आणि महापालिकेची फसवणूक केली.
फिर्यादी यांचा फ्लॅट प्लॅन प्रमाणे न बांधता दुसर्‍याच ठिकाणी बांधुन फिर्यादी यांची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | cheating case registered against Akruti Jay Developers Kondhwa Builder vyomesh mahipatrai shah manager jasmine rathod and accountant abhisha warenkar kondhwa Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा