Pune Crime | फसवणूक प्रकरणी हॉटेल ‘साहिल’चे नितीन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हॉटेल, इलेक्ट्रीकल, जीम, बांधकाम व्यवसायातील कंपन्यांच्या विस्तारीकरणासाठी चांगल्या परतावाचे आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडल्यानंतर गेल्या ६ वर्षात कोणताही परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी शैलेंद्र विलासराव पाटील Shailesh Vilasrao Patil (वय ४९ रा. मिरा सोसायटी, शंकरशेठ रोड) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नितीन चंद्रकांत नाईक Nitin Chandrakant Naik (रा. रामसुख अपार्टमेंट, सभाषनगर, शुक्रवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. नितीन नाईक यांनी त्यांचे हॉटेल व्यवसाय, ईलेक्ट्रीकल व्यवसाय, जीम व्यवसाय, बांधकाम व्यवसाय इत्यादी व्यवसाय असल्याचे व हॉटेल साहिल (Hotel Sahil) व सिमृत फूड (Simrat Foods) या कंपन्यांचा विस्तार करण्यासाठी गुंतवणुक करण्यास सांगितले. गुंतवणुकीवर चांगला परतावा (Good Returns On Investment) देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून ६ लाख ८९ हजार ५८० रुपये घेतले. जून २०१४ मध्ये त्यांनी ही गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर फिर्यादी यांना त्याबदल्यात त्यांना सुरक्षेपोटी ३१ मे २०२१ या तारखेचा धनादेश दिला होता. मात्र, त्यांनी परतावा न देता दिलेल्या रक्कमेचा अपहार (Pune Crime) केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक गाडे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | cheating case registered on hotel sahil’s Nitin Chandrakant Naik in Khadak Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !
पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे,
‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये;
सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात