Pune Crime | सिमकार्ड अपडेट करणे पडले महागात, ऑनलाइन दीड लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | मोबाईल कंपनीचे सीमकार्डची महिती अपडेट (Sim card Update) करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांना (Cyber thieves) पुण्यातील (Pune) एकाला ऑनलाईन दीड लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. हा प्रकार सीएससी ऑफिसमध्ये घडला आहे. याप्रकरणी तक्रारदार यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. सीमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने किंवा इतर कारणाने नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार (Pune Crime) वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.

विनोदकुमार राजेंद्रप्रसाद (वय-56 रा. व्हीनस गार्डन, खराडी, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी 9XXXX08333 या मोबाईल धारकावर आयटी अ‍ॅक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका खासगी कंपनीत कामाला आहेत.
काही दिवसांपूर्वी सायबर चोरट्यांनी त्यांना मोबाईल कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले.
तक्रारदार यांना 10 रुपयाचे रिचार्ज करण्यास सांगून मोबाइल सीमकार्ड अपडेट केले नाही तर सीमकार्ड बंद पडेल असे सांगितले.
त्यानंतर सीमकार्डची माहिती अपडेट करण्याच्या बहाण्याने चोरट्याने त्यांच्या SBI बँक खात्याला जोडलेल्या मोबाईल क्रमांक आणि खात्याची गोपनीय माहिती घेतली.
चोरट्याने तक्रारदार यांच्या बँक खात्यातून 1 लाख 49 हजार रुपयांची रोकड लंपास केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.

 

Web Title : pune crime | cheating case via sim card updates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Karad Crime | 2 चिमुकल्यांची गळा दाबून हत्या; आईचा आत्महत्येचा प्रयत्न

Pune Corporation Amenity Space | अ‍ॅमिनिटी स्पेस बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव पुणेकर कदापि सहन करणार नाहीत – काँग्रेसचे गटनेते आबा बागुल

Earn money | YouTube चा ‘हा’ प्रोग्राम 20 लाख लोकांसाठी बनला इन्कमचे माध्यम, तुम्ही सुद्धा यातून करू शकता लाखोंची कमाई; जाणून घ्या