Pune Crime | मंत्रालयात नोकरीच्या आमिषाने केली फसवणूक, टोळक्याने केला खून, सिंहगड परिसरातील खूनाची उकल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मंत्रालयात (Ministry) मेट्रोविभागासह (Metro Department) लोन मंजूर करून देण्याच्या आमिषाने फसवणूक (Fraud Case) एकाला जीवावर बेतली आहे. आरोपींनी दीड वर्षांनंतर संबंधिताचा शोध घेउन बेदम मारहाण (Beating) करीत त्याचा खून (Murder) केला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनीट तीनने अवघ्या १० तासांच्या आतमध्ये खूनाची उकल करीत टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Pune Crime)

 

सुनिल नलावडे (Sunil Nalavde) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश शंकरराव धुमाळ Mahesh Shankarao Dhumal) वय-३२ रा. पिंपळे खालसा, हिवरे कुभार, पदमावती वस्ती, ता. शिरुर), शिवराज किशोर प्रसाद Shivraj Kishore Prasad (सिंह वय-३२ रा. मोहितेवाडी, पोस्टा-वडगाव, ता-मावळ), शिवाजी रंगाप्पा तुमाले Shivaji Rangappa Tumale (वय ५६ रा. गंगानगर, फुरसुंगी), अक्षय पोपट आढाव Akshay Popatrao Adhav (वय- २२ रा. सिरापुर, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

सुनीलने ओळखीतील कुर्डेकर दाम्पत्याच्या मदतीने महेशला मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखविले होते. त्याशिवाय लोन (Loan) मंजूर करण्यासाठी काहीजणांची रक्कम उकळली होती. त्यानंतर दीड वर्षांपासून तो फरार झाला होता. तीन दिवसांपुर्वी सुनील हा वनिता कुर्डेकर (Vanita Kurdekar) हिच्या घरी आल्याची माहिती आरोपी महेश धुमाळ याला मिळाली. त्याने फसवणूक (Cheating Case) झालेल्या इतर साथीदारांना बोलावून सुनीलला नऱ्हेत जाउन बेदम मारहाण करून खून केला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट तीनने तळेगाव दाभाडे, फुरसुंगी, सिरापुर, ता. पारनेरमधून चौघांना ताब्यात घेतले. त्यांचा मोबाईल मोटार असा ५ लाखांचा ऐवज जप्त केला.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सहआयुक्त संदीप कर्णिक (Joint Commissioner Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ram Nath Pokle),
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of Police Srinivas Ghadge),
सहाय पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (Assistant Commissioner of Police Gajanan Tompe),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More), अजितकुमार पाटील, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे,
शरद वाकसे, रामदास गोणते, सुजित पवार, संजीव कंळबे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Cheating for the lure of a job in the ministry,
murder by a gang, murder in Sinhagad area solved crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा