Pune Crime | बँक मॅनेजरशी संगनमत करुन आईने मुलगा, मुलीला घातला साडेचौदा लाखांना गंडा; लोकमान्यनगरमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुलगा आणि मुलीचे बँक खात्याचे चेक (Bank Account Checks) चोरुन त्यावर बनावट सह्या (Bogus Signature) करुन आईनेच बँक मॅनेजरशी संगनमत (Conspiracy) करुन १४ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी लोकमान्यनगर (Lokmanya Nagar Pune) येथे राहणार्या एका २१ वर्षाच्या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८७/२२) दिली आहे. त्यानुसार फिर्यादीची आई व बँक मॅनेजर गौरव गिरीश लोणकर Gaurav Girish Lonakar (वय ३१, रा. नर्हे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बँक ऑफ बडोदाच्या (Bank Of Baroda) सदाशिव पेठ (Sadashiv Peth Pune) शाखेत १८ मे २०२१ रोजी घडला. (Pune Crime)
—
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या आई व बहिणीसह लोकमान्यनगर येथे राहतात.
फिर्यादी व त्यांच्या बहिणीचे बँक ऑफ बडोदाच्या सदाशिव पेठ शाखेत खाते आहे.
त्यांच्या आईने फिर्यादी यांचे दोन चेकवर प्रत्येकी ५ लाख रुपये व बहिणीच्या चेकवर ४ लाख ५० हजार रुपये अशी रक्कम टाकून त्यावर बनावट सह्या केल्या.
त्या खर्या आहेत, असे भासवून परस्पर बँकेतून ही रक्कम काढून त्याचा अपहार केला.
फिर्यादीची आई व बँक मॅनेजर यांनी दोघांची फसवणूक केली.
न्यायालयाच्या (Pune Shivaji Nagar Court) आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Cheating Fraud Case Bogus Signature Conspiracy With Bank Manager Of Bank Of Baroda Vishrambaug Police Station
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update