Pune Crime | ‘तुमच्या मुलाला ओळखतो, पोस्टात स्कीम सुरु झाल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेला घातला गंडा’; सिटी पोस्ट ऑफिसच्या आवारात घडलेली घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तुमच्या मुलाला ओळखतो, पोस्टात स्कीम (Investment In Post Office) सुरु झाली आहे, त्यात दागिने दाखवून पैसे मिळतात, असे सांगून एका चोरट्याने ज्येष्ठ नागरिक महिलेकडील (Senior Citizen Woman) २ लाख रुपयांचे दागिने घेऊन गंडा (Cheating Case) घालून पळून गेला. ही घटना सिटी पोस्ट ऑफिसच्या (City Post Office, Pune) आवारात शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime)

 

याप्रकरणी रविवार पेठेतील एका ६८ वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या रस्त्यातून जात असताना एक जण त्यांच्याजवळ आला.
मी तुमच्या मुलाला ओळखतो पोस्टात नवीन स्कीम सुरु झाली आहे (Post Office New Scheme).
त्यात सोन्याचे दागिने दाखविले की पैसे मिळतात. मी अनेकांना पैसे मिळवून दिले आहे.
तुम्हालाही पैसे मिळवून देतो, असे सांगितले. (Pune Crime)

त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी स्वत:चे व सुनेचे असे एकूण ५० ग्रॅम वजनाचे २ लाख रुपयांचे दागिने एका पिशवीत ठेवून त्या ७ वर्षाच्या नातवाला बरोबर घेऊन त्या या चोरट्याबरोबर सिटी पोस्ट ऑफिसमध्ये आल्या.
तेथे या चोरट्याने त्यांना तुमच्या आधार कार्डाची (Aadhaar Card) झेरॉक्स लागेल, असे सांगितले.
तेव्हा त्यांनी दागिने असलेली पिशवी नातवाकडे दिली व त्या झेरॉक्स आणायला बाहेर गेल्या.
तेव्हा या चोरट्याने आत दागिने दाखवून येतो, असे सांगून दागिने असलेली पिशवी घेऊन तो पळून गेला.
झेरॉक्स घेऊन परत आल्यावर त्यांना हा सर्व प्रकार समजला (Fraud Case).
चोरट्याने मास्क लावला असल्याने या आजींना त्याला ओळखता आले नाही. मुलाच्या ओळखीचा म्हणून त्यांनी विश्वास ठेवला होता.
पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Cheating Fraud Case Senior Citizen Woman Incident at the City Post Office Premises Pune Faraskhana Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा