Pune Crime | शेठला मुलगा झाल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक, वारजे माळवाडीमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आमच्या शेठला मुलगा झाला आहे, तो म्हातार्‍यांना साड्या, पैसे वाटत असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिक महिलांना लक्ष्य करण्याचा चोरट्यांचा प्रकार वारंवार घडत आहे. वारजेमध्ये या चोरट्यांच्या जाळ्यात एक महिला अडकली अन ८० हजार रुपयांचे मंगळसुत्र (Mangalsutra) गमावून बसल्या. (Pune Crime)

 

याप्रकरणी वारजेमध्ये (Warje Malwadi) राहणार्‍या एका ६२ वर्षाच्या महिलेने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४३७/२२) दिली आहे. यावरुन पोलिसांनी दोघा चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी पावणे बारा वाजता वारजेतील ओंकार कॉलनीमध्ये घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ओंकार कॉलनीत असताना दोघे जण त्यांच्याजवळ आले. आमेच साहेबाला खूप वर्षातून मुलगा झाला आहे. ते गोरगरीब महिलांना साड्या व पैसे वाटत आहेत, असे बोलून फिर्यादीचे गळ्यातील ८० हजार रुपयांचे मंगळसुत्र काढून त्यांच्या जवळील मळक्या पिशवीत ठेवण्यास सांगून त्यांच्या विश्वास संपादन केला. तुम्ही इथेच बसा आमचे शेठ येतील, असे म्हणून फिर्यादीचे दागिने घेऊन निघून जाऊन फिर्यादीची फसवणूक (Cheating Case) केली. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.

 

काही दिवसांपूर्वी असेच प्रकार बाणेर (Baner) आणि सिंहगड रोडला (Sinhagad Road) घडले होते.
दोन ते तीन चोरटे हे प्रकार करीत असल्याचे दिसून येत आहे.

 

Web Title :- Pune Crime | Cheating Fraud Case Warje Malwadi Police Station Limits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

T20 World Cup | पाकिस्तानच्या PM ने केलेल्या ट्विटवर इरफानचे सडेतोड उत्तर, म्हणाला ” तुमच्यात आणि आमच्यात….”

Uddhav Thackeray | नाशकात ठाकरे गटात घरवापसी सत्र सुरु

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांवर टीकास्त्र, म्हणाले – ‘अनेक विकासकामे केली त्यामुळे विरोधकांना…’